Newaworldmarathi Pune: महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवत राज्यात नंबर एकचा मान पटकावला आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात प्रभाग क्रमांक २१ मध्ये भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपाकडून मिळालेल्या या विजयाबद्दल प्रभागातील प्रमुख दहा चौकांमध्ये नागरिकांना लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा आनंदोत्सव गुलटेकडी चौक, संत नामदेव शाळा चौक, संत ज्ञानदेव शाळा चौक, श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, सिटी प्राईड थिएटर सातारा रोड, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस चौक, मार्केट यार्ड प्रेमनगर चौक, डॉ. आंबेडकर नगर चौक, संदेश नगर भिमाले कॉम्प्लेक्स तसेच ज्योती हॉटेल चौक, समता नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक २१ (ब) ओबीसी महिला राखीव गटातील प्रमुख दावेदार सौ. समृद्धी अरकल-शेरला यांच्यासह संदीप शेळके, महेश कारंडे, ईश्वर वायाळ, बापू कांबळे, गणेश शेरला, महेश सकट, बसवराज गायकवाड, अविनाश गायकवाड, अनिल निळुलर, बाळासाहेब शेलार, चितामणी जगताप यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नागरिकांना स्वतः लाडू बनवत व वाटप करत आनंद साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात तसेच उंटावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “जय श्रीराम” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाजपाच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.


Recent Comments