Newaworldmarathi Pune: पुणेकरांचा विशेष पसंतीचा आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन हंगामाच्या सुरुवातीला यावर्षी सुद्धा 25 ते 30 टक्क्याहून वाढून घाऊक बाजारात 12000 ते 14000 प्रतिक्विंटल सुरुवात झाली आहे.गेल्या दोन वर्षात आंबेमोहोर तांदळामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली,भाव वाढीचे प्रमुख कारण नॉन बासमती मध्ये निर्यात व उत्पादन कमी.
महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहर तांदळांपैकी 80 टक्के तांदूळ मध्यप्रदेश मधून तर उर्वरित 20 टक्के तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो.यावर्षी सुद्धा या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे,त्याचबरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी सुरुवातीलाच आंबेमोहर तांदळाची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो,हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो.विशेषता पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे.वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर,इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळांपैकी आंबेमोहोर चांगली मागणी आहे.त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचा दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते.महाराष्ट्रात कामशेत भोर या भागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते काही वर्षांपूर्वी आंबेमोहोर सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते परंतु हा तांदूळ पिकवणाऱ्या पुणे,मावळ,भोर, कामशेत या पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनीला चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या.
हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले म्हणून आंबेमोहर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे.तसेच आंबेमोहोर तांदळाच्या भाव वाढीमुळे पुणेकरांचा मावळ इंद्रायणी या तांदळाची मागणी वाढत आहे.
यावर्षी देशातील तांदळाचे उत्पादन 1250 लाख टन एवढे आले आहे त्यामुळे आंबेमोहोर शिवाय बासमती, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळाचे दर वर्षभर स्थिर राहतील.
नवीन हंगामातील तांदळाची आवक आज रोजी आली आणि त्याची विधीसर पूजा करून विक्रीस सुरुवात झाली.
अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शाह यांनी दिली.
घाऊक बाजारात नवीन तांदळाचे दर प्रतिक्विंटल
बासमती 12000 ते 13000
इंद्रायणी 6000 ते 7000
सुरती कोलम 6000 ते 7000
घाऊक बाजारात आंबेमोहोर तांदळाचे मागील तीन वर्षातील प्रतिक्विंटल दर
2023-2024 7000 ते 8000
2024-2025 8000 ते 9000
2025-2026 12000 ते 14000


Recent Comments