Newsworldmarathi Pune: महापालिकेतील सत्ताकारण स्थानिक नेत्यांकडेच असावे, अशी भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या २६ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रशांत जगताप यांच्या या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, “दोन्ही गट एकत्र येणार असतील तर मी पक्षात राहणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका प्रशांत जगताप यांनी आधीच मांडली होती. अखेर त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत राजीनामा दिला. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना राष्ट्रवादीच्या दोन वरिष्ठ नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची चर्चा आहे. केवळ नाराजी व्यक्त केल्यामुळे एका अनुभवी स्थानिक नेत्याला डावलले गेले, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नेमके काय साध्य केले, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नेतृत्व नाराज होऊन बाहेर पडल्याने पक्ष संघटनेवर आणि आगामी महापालिका राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Recent Comments