Homeपुणेशासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य, गणेश बिडकरांच्या महा ई-सेवा केंद्रातून २७...

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य, गणेश बिडकरांच्या महा ई-सेवा केंद्रातून २७ हजार नागरिकांना लाभ

Newsworldmarathi Pune: नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभरीत्या मिळावा या उद्देशाने माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी त्यांच्या प्रभागात सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रांमुळे आतापर्यंत तब्बल २७ हजार नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे. जवळपास प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती या सेवांचा लाभार्थी ठरल्याने जनसंपर्कादरम्यान नागरिकांकडून बिडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.

केंद्र, राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेच्या विविध योजनांची अंमलबजावणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवार व रास्ता पेठ परिसरात महा ई-सेवा केंद्रांची उभारणी करण्यात आली. या केंद्रांमधून उत्पन्न व रहिवासी दाखले, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड आदी महत्त्वाची शासकीय कागदपत्रे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी ‘टीम बिडकर’च्या कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत आजवर ७ हजार विविध दाखले, ४ हजार १७४ आधार कार्ड, ४ हजार शहरी गरीब कार्ड, ४ हजार ४२९ मतदान ओळखपत्र तसेच १ हजार ८०० ई-श्रम कार्ड वितरित करण्यात आली आहेत. एका ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून महा ई-सेवा केंद्र प्रभावीपणे कार्यरत असल्याचे चित्र आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments