Homeपुणेपुणे महापालिका निवडणूक रंगात; नणंद अजित पवार गटात तर भावजई शरद पवार...

पुणे महापालिका निवडणूक रंगात; नणंद अजित पवार गटात तर भावजई शरद पवार गटात

Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून यंदाच्या निवडणुकीत अनेक नातेवाईक एकमेकांविरुद्ध किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने रिंगणात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच एका अनोख्या राजकीय समीकरणाची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे. प्रभाग क्रमांक २८ (जनता वसाहत, हिंगणे खुर्द) आणि प्रभाग क्रमांक २७ (पर्वती–नवी पेठ) या दोन प्रभागांमध्ये नणंद आणि भावजई या नात्यातील दोन महिला उमेदवार वेगवेगळ्या पक्षांच्या व वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत.

विशेष म्हणजे वेगवेगळ्या गटांतून निवडणूक लढवत असतानाही या दोघी एकत्र प्रचार करत असल्याचे दृश्य मतदारांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणूक जिंकण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला असून आपापल्या प्रभागातील विकासाचा मुद्दा पुढे ठेवत त्या मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.

पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत प्रिया गदादे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात आहेत. प्रिया गदादे पाटील या २०१२ पासून पुणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रभागातील विविध विकासकामांवर भर दिला आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव मतदारांसमोर मांडत त्या पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, प्रिया गदादे पाटील यांच्या कुटुंबातील अक्षदा प्रेमराज गदादे पाटील यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे. वेगवेगळ्या गटांतून उमेदवारी असूनही दोघींचा एकत्र प्रचार हा या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments