Homeपुणेप्रभाग 22 मधील लोहियानगरामध्ये अर्चना पाटील यांच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद

प्रभाग 22 मधील लोहियानगरामध्ये अर्चना पाटील यांच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद

Newsworldmarathi Pune: ‘विकास’ हेच अंतिम ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने काम करणाऱ्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रभाग क्रमांक २२ ‘क’ मधील लोहियानगर येथे काढलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले असून, हा प्रतिसाद त्यांच्या विजयाची नांदी असल्याचे चित्र दिसून आले.

लोहियानगर येथील श्रीराम मंदिरापासून अत्यंत पवित्र आणि मंगलमय वातावरणात या पदयात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर ही रॅली संपूर्ण प्रभागातून मार्गक्रमण करत पुढे सरकली. रॅलीदरम्यान महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. गेल्या आठ वर्षांत सौ. अर्चना पाटील यांनी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि अन्य मूलभूत सुविधांसाठी केलेल्या प्रभावी कामाची दखल घेत नागरिकांनी त्यांना पुन्हा संधी देण्याचा निर्धार केल्याचे या रॅलीतून स्पष्ट झाले. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत आपला उत्साह आणि प्रेम व्यक्त केले. अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपाच्या या रॅलीमुळे संपूर्ण प्रभाग भाजपमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पदयात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना सौ. अर्चना पाटील यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “आज मिळालेला हा प्रतिसाद माझ्या आठ वर्षांच्या मेहनतीचे आणि तपश्चर्येचे फळ आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. जनतेने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य असून, याच विश्वासातून पुढील कार्यकाळातही मी अधिक जोमाने जनसेवा करेन,” असे त्या म्हणाल्या.

या रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साह दाखवत सौ. अर्चना पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि मजबूत जनसंपर्कामुळे त्या मोठ्या बहुमताने विजयी होतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments