Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ९ मध्ये मराठवाडा भागातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा मित्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधत सामाजिक एकोप्याचे आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
आमदार बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मेघना बोर्डीकर यांच्या निवडणुकीदरम्यान लहू अण्णा बालवडकर यांनी अत्यंत सक्रिय आणि प्रामाणिक सहकार्य केले होते. त्या काळात त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजहितासाठी आणि पक्षाच्या कामासाठी योगदान दिले होते. आज त्या सहकार्याची परतफेड करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लहू अण्णा बालवडकर हे सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेले नेतृत्व असून, त्यांनी नेहमीच मराठवाडा समाजासह सर्व घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि लोकांशी असलेल्या थेट नात्याची आठवण करून देत आमदार बोर्डीकर यांनी मतदारांना आवाहन केले की, या वेळी लहू बालवडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
प्रभाग क्रमांक ९ मधील विकास, सामाजिक सलोखा आणि सर्व घटकांना न्याय देणारे नेतृत्व घडवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची ही संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. लहू बालवडकर यांना मतदान करूनच पूर्वी मिळालेल्या सहकार्याची खरी परतफेड होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उपस्थित मतदारांना एकजुटीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.


Recent Comments