Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात प्रचाराला वेग आला असून, नागरिकांच्या रोजच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि भविष्यासाठी ठाम भूमिका मांडण्यावर भर दिला जात आहे. केवळ प्रचारापुरते न राहता थेट जनतेशी संवाद साधून प्रश्न समजून घेणे आणि त्यावर ठोस उपाययोजना मांडणे, हाच खरा लोकप्रतिनिधींचा कस असतो. याच विचारातून प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार लहू बालवडकर यांनी बालेवाडी येथील गोल्डन ट्रेलीज सोसायटीला भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला.
टँकरमुक्त सोसायटीच ठोस आश्वासन
या भेटीदरम्यान सोसायटीतील नागरिकांनी पाणीटंचाई, टँकरवर अवलंबून राहण्याची मजबुरी, नागरी सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी यासह विविध प्रश्न मोकळेपणाने मांडले. विशेषतः टँकरमुक्त बालेवाडी ही नागरिकांची प्रमुख मागणी होती. यावर प्रतिक्रिया देताना लहू बालवडकर यांनी या भागाला लवकरात लवकर टँकरमुक्त करण्याचे ठोस आश्वासन दिले. नियोजनबद्ध पाणीपुरवठा, योग्य पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी समन्वय साधून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
ज्येष्ठ नागरिकांचा ठाम आणि एकमुखी पाठिंबा
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येचे गांभीर्याने ऐकून घेत, त्या वेळेत आणि प्रभावीपणे सोडवण्याचा स्पष्ट शब्द लहू बालवडकर यांनी दिला. संवादादरम्यान त्यांच्या संयमी स्वभावामुळे आणि प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.या भेटीत विशेष लक्ष वेधून घेतला तो ज्येष्ठ नागरिकांचा ठाम आणि एकमुखी पाठिंबा. बालेवाडीतील गोल्डन ट्रेलीज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्टपणे “प्रभाग क्रमांक ९ मधून आमचा पूर्ण पाठिंबा फक्त लहू अण्णांनाच” अशी भूमिका मांडली. विकासाभिमुख विचार, सहज उपलब्ध नेतृत्व आणि प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्याची तयारी यामुळे लहू बालवडकरांवरील विश्वास अजिबात डळमळलेला नाही, हे या संवादातून स्पष्ट झाले.
भेटीतून लहू बालवडकर आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ
एकंदरच, बालेवाडीतील या भेटीतून लहू बालवडकर आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर पाठिंबा हा केवळ राजकीय समर्थन नसून, त्यांच्या कामावर आणि भूमिकेवर व्यक्त केलेला विश्वास असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.


Recent Comments