Homeपुणेबालवडकर विरुद्ध बालवडकर' लढतीत भाजपची आघाडी; चंद्रकांत पाटलांच्या भाकिताने जोर चढला

बालवडकर विरुद्ध बालवडकर’ लढतीत भाजपची आघाडी; चंद्रकांत पाटलांच्या भाकिताने जोर चढला

Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक ९ (सूस-बाणेर-बालेवाडी-पाषाण) ही लढत शहरातील सर्वाधिक हाय-व्होल्टेज ठरली आहे. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अमोल बालवडकर यांच्यातील स्पर्धा तीव्र असताना, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मोठ्या भविष्यवाणीने प्रचाराला नवे वळण मिळाले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात (६ जानेवारी) मोठा दावा केला. ते म्हणाले, “प्रभाग ९ मधून लहू बालवडकर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून विजयी होतील. डायरीत लिहून ठेवा, ही भविष्यवाणी खरी ठरेल.” या वक्तव्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, प्रभागातील आरएसएस केडर सक्रिय झाले आहेत. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत विकास मुद्द्यांवर (रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक) प्रचार सुरू आहे. पदयात्रा आणि सोसायटी भेटींमुळे भाजपची मोहीम गतीमान झाली आहे.

दुसरीकडे, अमोल बालवडकर यांचा कुख्यात गुंड निलेश घायवळ सोबतचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, भाजप समर्थकांकडून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमुळे अमोल बालवडकरांच्या प्रतिमेला धक्का बसला असून, त्यांच्या प्रचाराला ब्रेक लागला आहे. अमोल बालवडकरांनी सोसायट्यांमध्ये संवाद साधत असले तरी, व्हिडिओच्या चर्चेने अडचणी वाढल्या आहेत.

भाजपकडून लहू बालवडकर, रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांचे पॅनेल आहे, तर राष्ट्रवादीकडून अमोल बालवडकर, गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे आणि पार्वती निम्हाण यांचे पॅनेल आहे. प्रभागातील आयटी हब आणि निवासी मतदार विकास आणि निष्ठेवर भर देत असल्याने, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने आणि RSS केडरच्या सक्रियतेने लहू बालवडकरांसाठी वातावरण सकारात्मक झाले आहे.१५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असून, ही लढत ‘निष्ठावंत विरुद्ध बंडखोर’ अशी रंगत घेत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments