Homeपुणेजाहीरनाम्यात सर्वसमावेशक विकासाचेच धोरण: आबा बागुल

जाहीरनाम्यात सर्वसमावेशक विकासाचेच धोरण: आबा बागुल

Newsworldmarathi Pune: प्रभागातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य,शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते ,वाहतूक आदींसह सर्वच बाबींचा अंतर्भाव असलेला जाहीरनामा हा सर्वसमावेशक विकासाचे धोरण असून ते निश्चित दिशादर्शक ठरेल असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर – पद्मावतीमधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ३६ साठी सर्वांगीण विकासाचे व्हिजन हे पायाभूत सुविधाबरोबरच नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ज्या योजना मी या व्हिजनमधून मांडल्या आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी उपलब्ध करून देणार आहेत.

त्यासाठी ते स्वतः लक्ष घालणार आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा वाढविण्यासाठी राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा, अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज आणि प्रभाग व शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीधारकांना स्वयंपुनर्विकासातून हक्काची घरे , शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाला दिलेली स्थगिती कायम ठेवून तेथील रहिवाशांना स्वयंपुनर्विकासाची मुभा निश्चितच मिळणार आहे.हे लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.त्यासाठी शिवसेनेला भरभरून मतदान करण्याचे आवाहनही आबा बागुल यांनी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments