Newsworldmarathi Pune: प्रभाग क्र. २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांनी सध्या राबवलेली ‘घरोघरी संवाद मोहीम’ प्रचंड वेग घेत असून, या मोहिमेला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील प्रत्येक सोसायटी, चाळ आणि वस्तीमध्ये त्या स्वतः उपस्थित राहून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान विशेषतः महिला वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक सोसायटीतील सदस्य स्वतःहून सौ. अर्चना पाटील यांच्या स्वागतासाठी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. पारंपारिक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत अनेक ठिकाणी सुवासिनींकडून औक्षण करून सौ. अर्चनाताईंचे स्वागत करण्यात येत आहे. “आमच्या हक्काची आणि सुख-दुःखात कायम धावून येणारी उमेदवार” अशा शब्दांत महिला भगिनी आपल्या भावना व्यक्त करत विजयाचे आशीर्वाद देत आहेत.
नागरिकांकडून मिळणारा हा उदंड प्रतिसाद आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास, हे सौ. अर्चना पाटील यांनी गेल्या आठ वर्षांत केलेल्या निस्वार्थ जनसेवेचे आणि विकासकामांचे खरे प्रतीक मानले जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी सातत्याने काम केल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
सोसायटीतील रहिवासी असोत किंवा वस्तीतील नागरिक, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. “कामे केली आहेत आणि पुढेही कामे करतील,” या ठाम विश्वासातून जनता पुन्हा एकदा सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र या ‘घरोघरी संवाद मोहिमे’तून स्पष्टपणे दिसून येत आहे.


Recent Comments