Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मधील डायस प्लॉट परिसरात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून, २०१७ सालच्या पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून प्रभाग २२ मधून निवडणूक लढवलेले उमेदवार अविनाश गोतरणे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
अविनाश गोतरणे यांनी २०१७ च्या निवडणुकीत डायस प्लॉट परिसरातून तब्बल ९ हजार मते मिळवली होती. त्यांची प्रभागातील ओळख, कार्यकर्त्यांचा मोठा संपर्क आणि नागरिकांशी असलेले दृढ नाते लक्षात घेता, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना, विशेषतः अर्चना तुषार पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी बोलताना अविनाश गोतरणे यांनी भाजपचे विकासाभिमुख धोरण, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले निर्णय आणि स्थानिक पातळीवर उमेदवारांनी केलेली कामे यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यापुढे प्रभागाच्या विकासासाठी आणि भाजपच्या विजयासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्चना तुषार पाटील यांनी अविनाश गोतरणे यांचे भाजपमध्ये स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा निश्चितच आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. डायस प्लॉट परिसरातून मिळणारा वाढता पाठिंबा आणि अनुभवी नेत्यांचा पक्षप्रवेश यामुळे प्रभाग २२ मध्ये भाजपची स्थिती अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


Recent Comments