Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचाराला आज मोठे बळ मिळाले. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष उपस्थिती लावत आयोजित भव्य सभेत मार्गदर्शन केले. या सभेनंतर काढण्यात आलेल्या विशाल बाईक रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रचार सभेस राज्याचे माजी मंत्री मा. श्री. दिलीप कांबळे आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनील कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेत बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. पुण्याच्या आणि विशेषतः प्रभाग २२ ‘क’ च्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून सौ. अर्चना पाटील या सक्षम व विकासाभिमुख उमेदवार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार सुनील कांबळे आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांनीही मतदारांशी संवाद साधत प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन केले. प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेनंतर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत तरुण आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. शेकडो दुचाकींनी काशेवाडी व डायस प्लॉट परिसरात प्रचार करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे सौ. अर्चना पाटील यांच्या प्रचाराला नवी गती मिळाली आहे.


Recent Comments