Homeपुणेमल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांना आधारवड ठरणार: आबा बागुल

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांना आधारवड ठरणार: आबा बागुल

Newaworldmarathi Pune: नागरिकांना पायाभूत सुविधांसह आरोग्यसेवेसाठीही व्हिजनमध्ये एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तरतूद केल्याने ते नागरिकांसाठी निश्चित आधारवड ठरणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचाराला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.विशेषतः महिला वर्गाचा उत्साह लक्षवेधी ठरत आहे.पदयात्रा,कोपरा सभांमधून आबा बागुल यांनी व्हिजनमध्ये मांडलेल्या पंचसूत्रीला लोकांची पसंती मिळत आहे.पंचवार्षिकमध्ये होणारी पाच कामे जी लोकांसाठी महत्वाची आहेत,ते यंदाच्या निवडणुकीत एक वैशिष्टे ठरले आहे.

याबाबत आबा बागुल म्हणाले की,जाहीरनामा प्रत्येकजण मांडत असतो पण ते पूर्णत्वास जाते का हे महत्वाचे आहे.आजवर मी जे जे मांडले आहे, ते पूर्ण केलेले आहे.त्यामुळे यंदाही नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीला प्राधान्य दिले आहे.
आज खासगी हॉस्पिटलमध्ये महागड्या आरोग्य सेवा लोकांना परवडत नाही.त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीला प्राधान्य असणार आहे.

हे ३०० खाटांची क्षमता असलेले सर्व सुविधांनी युक्त रुग्णालय असणार आहे.आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक निदान व उपचार सुविधा,सामान्य नागरिकांना परवडणारी, दर्जेदार आरोग्य सेवा,गरीब व मध्यमवर्गीयांसाठी विशेष सवलती व योजना असणार आहेत.एकप्रकारे निरामय आरोग्यासाठी ही भक्कम पायाभरणी असणार आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments