Newaworldmarathi Pune: राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे साने गुरुजी बालक मंदिर व प्राथमिक शाळेमार्फत आयोजित तिळगूळ समारंभ उत्साहात साजरा झाला.मा शिक्षणाधिकारी मा.अनिल गु़ंजाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी अनमोल विचार मांडत त्यांनी उपस्थित पालकांना जबाबदार पालकत्वाची विनोदी शैलीत जाणिव करुन दिली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव शिवाजी खांडेकर उपस्थित होते. त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातील काही उदाहरणे देत समजदार व जागरूक पालक कोणाला म्हणता येईल याबाबत विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका मीना काटे, सेवाज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सुषमा शिंगाडे,शिक्षणप्रेमी अविनाश खंडारे उपस्थित होते. यावेळी सर्व पालकांना मुख्याध्यापिका मीना काटे यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू तसेच शिक्षणप्रेमी अविनाश खंडारे यांनी दरवर्षीप्रमाणे तिळगूळ वड्या दिल्या.यावेळी स्त्री व पुरूष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, विठ्ठल शेवते, शितल खेडकर, लक्ष्मी कांबळे , मोनिका पोटे, शितल रुपनूर, निशा नाईकनवरे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मीना काटे यांनी केले. सूत्रसंचालन संगिता गोवळकर यांनी तर आभार सोपान बंदावणे यांनी मानले.



Recent Comments