Newaworldmarathi Pune : देशभर तसेच गुजरात राज्याबाहेर वास्तव्यास असलेल्या गुजराती समाजाला एकत्र आणण्यासाठी गुजरात सरकारने विशेष समितीची स्थापना केली असून, या समितीवर सामाजिक कार्यात सक्रिय असलेले डॉ. राजेश शहा यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. राजेश शहा यांच्या निवडीचे अधिकृत आदेश गुजरात सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी विनेश सिंह यांनी पाठवले आहेत. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी असून, या कालावधीत देशभरातील गुजराती समाजाचे संघटन, विविध संस्थांशी समन्वय आणि समाजहिताचे उपक्रम राबविण्याची जबाबदारी समितीवर राहणार आहे.
गुजराती समाजाच्या संघटनासाठी आणि त्यांच्या क्षमतेचा देशाच्या विकासासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या समितीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी समितीच्या माध्यमातून गुजरातबाहेरील गुजराती समाजाशी थेट संपर्क साधून त्यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्यासाठी एकत्र आणण्यावर भर दिला जाणार आहे.
गुजराती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षमतेचा उपयोग राष्ट्रीय प्रगतीसाठी व्हावा, या उद्देशाने ही समिती कार्य करणार आहे. विविध राज्यांत कार्यरत असलेल्या गुजराती संस्था, उद्योजक, युवक आणि व्यावसायिक यांना एकत्र आणून देशाच्या उत्कर्षात योगदान देणे, हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डॉ. शहा यांच्या अनुभवामुळे समितीच्या कामकाजाला अधिक प्रभावी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत डॉ.राजेश शहा यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे , त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकतेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी (पी.एचडी) देऊन सन्मानित केले आहे तसेच प्रतिष्ठित अशा फेअर बिझनेस प्रॅक्टीसेस करीता देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्काराने तीन वेळा सम्मानित करण्यात आले आहे. याशिवाय समाजरत्न, आदर्श व्यापारी त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार, व्यापार भूषण, राष्ट्रिय ऐकता पुरस्कार, कर्मवीर पुरस्कार, बेस्ट बिसनेसमॅन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे.
पुण्यातील सुप्रसिध्द उपक्रम लाडू-चिवडा चे ते जनक असून या उपक्रमासह डॉ.राजेश शहा यांचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदले आहे.डॉ.राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ व या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन आहेत. तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून श्री पूना गुजराती बंधु समाज या ११० वर्षे पासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे सुवर्ण महोत्सवी वर्षाततील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिशयन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे गेल्या २५ वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. त्याचबरोबर जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार म्हणून ही ते कार्यरत आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या विविध पदांवर डॉ.राजेश शहा कार्यरत आहेत.



Recent Comments