Homeपुणेसंभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तीव्र निषेध

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तीव्र निषेध

Newaworldmarathi Pune :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज संभाजी भिडे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि अवमानकारक विधानांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून कार्यकर्त्यांनी भिडेंच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

देशाचे कृषीमंत्री व संरक्षण मंत्री अशी अत्यंत महत्त्वाची पदे भूषवलेले, देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेल्या मा. शरदचंद्रजी पवार साहेबांवर “देशद्रोही” असा आरोप करणे हे अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार व निषेधार्ह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देशासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या थोर राष्ट्रनेत्यावर आरोप करणाऱ्या संभाजी भिडे यांनी देशासाठी नेमके कोणते उल्लेखनीय कार्य केले आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

संभाजी भिडे हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून समाजात द्वेष पसरवण्याचे काम करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. महिलांच्या आई-बहिणींच्या पेहरावावर अशोभनीय वक्तव्ये करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीने पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याबाबत बोलणे ही त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच द्योतक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे अशा व्यक्तीस मोदी सरकारकडून “सो.” किताब बहाल करण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

संभाजी भिडे यांनी त्यांच्या विधानांबद्दल महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात अध्यक्ष श्रीकांत पाटील, विशाल ताबे, मा. उदय महाले, स्वाती पोकळे, भगवान साळुंके, डॉ. सुनील जगताप, किशोर काबळे, औदुंबर खुने, श्रद्धा कुदळे, हेमंत येवलेकर, रोहन पायगुडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments