Homeपुणेचाटे पब्लिक स्कूल येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

चाटे पब्लिक स्कूल येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Newsworldmarathi Pune: संविधान हि निती आणि धर्म हा जीवन जगण्याची आदर्श पध्दती व संस्कार आहे. लोकशाहीच्या रथाची ही दोन्ही चाकं योग्य पध्दतीने पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी डॉ सागर डोईफोडे यांनी केले.

Advertisements

धनकवडी येथील चाटे पब्लिक स्कूल येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळा प्रसंगी चाटे स्कूल चे माजी विद्यार्थी जे सध्या दिव दमण व दादरा नगर हवेली चे प्रशासकिय सचिव म्हणून कार्यरत असलेले आयएएस अधिकारी डॉ सागर डोईफोडे, भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, शिवव्याख्याते राहूल नलावडे, चाटे शिक्षण समुहाचे संस्थापक फुलचंद चाटे आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले.

Advertisements

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगतं, योगासने व कलागुणं सादर केली. यानिमित्ताने डॉ डोईफोडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनातील धेय प्राप्तीसाठी आवश्यक असलेला मूलमंत्र दिला. तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान संस्थेतर्फे करण्यात आले.

फुलचंद चाटे सरांनी आपल्या प्रास्ताविकात चाटे शिक्षण समुहाच्या चौफेर प्रगतीचा आढावा मांडला. तृप्ती देसाई यांनी चाटे शिक्षण समुह हा देशाचे जबाबदार नागरिक घडवणारी एक नामांकित शिक्षण संस्था आहे असे गौरवोद्गार काढले. आभार संस्थेच्या प्राचार्यांनी मानले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments