पुणे महानगरपालिका सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भांडवली निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
प्रभाग ३४ अंतर्गत साईधाम टाकी ते पारी कंपनी चौक धायरी सर्वे नं ३० येथील सुमारे ८०० मीटर पाणीपुरवठा लाईन टाकण्याचे काम तसेच वडगाव बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज नगर, मारुती चवड कॉलनी व वडगाव बुद्रुक समाज मंदिर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कामांसाठी नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका कोमल नवले, नगरसेविका जयश्री भूमकर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी नगरसेवक श्रीकांत जगताप, नगरसेवक सचिन मोरे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले यांच्यासह माजी स्व. सदस्य गंगाधर भडावळे, सागर भूमकर, सारंग नवले, मंडलाध्यक्ष यशवंत लायगुडे, तुषार पोकळे, आशुतोष पोकळे, सुमित बेनकर, रमेश चरवड, सचिन मनेंरे, शहाजी वांजळे, बाळासाहेब पौरे (काका), दत्तात्रय देशपांडे, अतुल
बोरा, अतुल काजळे, संदीप चवड, प्रकाश लिम्हण, स्वप्रिल घाटे, सुनील कांबळे, चंद्रकांत पवळे, मंगेश पायगुडे, अभिजित आढाव, सिद्धांत घोलप, मुकुंद कांबळे, बाळासाहेब चरवड, पांडुरंग वानखेडे महाराज, मुगुट पासलकर, सुरेंद्र गायकवाड, प्रकाश माने, गुलाबराव पाटील जितू बुजवले, ज्ञानेश्वर साठे, रमेश मंडळी, परमेश्वर शिंगणापूर, दत्ता
पिसे, सदाशिव गाडेकर, अमोल मिरेकर, सुरेश बोडके, निलेश पायगुडे , महेश भिसे, अमोल गंगावणे, अतुल फाळके, सतीश नलावडे, अनिल गायकवाड, माऊली नलावडे, गणेश नलावडे, विठ्ठल फाळके, भगवान मिसाळ, मनोहर महाजन, सुनील बर्गे, मोतीराम जाधव, रमजान शेख, पप्पू ढेबे, शिवाजी पवार, सचिन खंडागळे, विजय यादव, योगेश कोळेकर, डॉ. रॉय, अमोल नलावडे, विजय नलावडे, प्रदीप टाकले, भारत भूषण ओझा, दत्ता माने, सिद्धेश्वर सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे साहेब आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार भीमराव तापकीर यांनी नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. तसेच येथील चारही भाजप नगरसेवक प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.



Recent Comments