Homeभारतप्रभाग ३४ मध्ये ट्राफिक सिग्नल स्थलांतराची मागणी; नगरसेविका कोमल नवले यांचे निवेदन

प्रभाग ३४ मध्ये ट्राफिक सिग्नल स्थलांतराची मागणी; नगरसेविका कोमल नवले यांचे निवेदन

Newaworldmarathhi Pune: प्रभाग क्रमांक ३४ मधील सिंहगड रोड परिसरात वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक सिग्नलचे योग्य नियोजन करण्याची मागणी पुढे आली आहे. सिंहगड रोडलगत असलेल्या राजयोग सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या बसवण्यात आलेला ट्राफिक सिग्नल स्थलांतरित करून तो लायगुडे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मुख्य चौकात बसवण्यात यावा, तसेच त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका कोमल नवले यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांना निवेदन सादर केले. सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर निवासी व व्यावसायिक विकास सुरू असून, वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या ट्राफिक सिग्नलच्या ठिकाणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरसेविका कोमल नवले यांनी सांगितले की, “सिंहगड रस्त्यावरील वाढत्या डेव्हलपमेंटमुळे भविष्यातील ट्राफिक समस्यांचा विचार करून नियोजनबद्ध पावले उचलणे गरजेचे आहे. वाहतूक समस्येबाबत जागरूक राहून काम करण्याचा माझा निर्धार आहे. त्यामुळेच आज हे निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर संबंधित काम पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.” या मागणीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments