Homeपुणेपुणे मेट्रोत ‘रुपे ऑन-द-गो’ची सुविधा सुरू

पुणे मेट्रोत ‘रुपे ऑन-द-गो’ची सुविधा सुरू

पुणे : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि महामेट्रोच्या सहयोगाने, विशेष अ‍ॅक्वायरर बँक म्हणून एचडीएफसी बँकेच्या सहभागातून पुणे मेट्रोमध्ये ‘रुपे ऑन-द-गो’ (ओटीजी) कार्ड स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांच्या विद्यमान किंवा नव्या रुपे ऑन-द-गो कार्डद्वारे थेट मेट्रो प्रवास करता येणार असून, संपर्करहित आणि इंटरऑपरेबल डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे तिकीट प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

पुणे मेट्रोत सध्या कागदी तिकीट, मोबाइल क्यूआर तिकीट तसेच एचडीएफसी बँकेचे ‘वन पुणे एनसीएमसी रुपे कार्ड’ उपलब्ध असताना आता ओपन-लूप रुपे ऑन-द-गो प्रणालीमुळे प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. मेट्रोच्या सर्व २९ कार्यरत स्थानकांवर ‘टॅप अँड ट्रॅव्हल’ची सुविधा उपलब्ध झाली असून, प्रत्येक मार्गिकेसाठी स्वतंत्र तिकीट खरेदी करण्याची गरज उरणार नाही.

दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी यांना एकाच कार्डवर संपूर्ण नेटवर्कमध्ये प्रवास करता येणार आहे. तसेच या कार्डद्वारे विविध बस व मेट्रो सेवांमध्ये इंटरऑपरेबिलिटी साधली जाणार असून, ऑफलाइन पेमेंटची सुविधाही उपलब्ध असल्याने कमी नेटवर्क असलेल्या भागांमध्येही प्रवाशांना अडथळा येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments