Homeभारतहिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोची चाचणी यशस्वी

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोची चाचणी यशस्वी

पुणे : प्रतिनिधी
हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेची पहिली ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. आयटी क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सुमारे २३.२०३ किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण उन्नत मार्ग असून त्यावर एकूण २३ स्थानकांचा समावेश आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणारा हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प मानला जातो. सुमारे ८,३१३ कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प लवकरच प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता असून, हिंजवडी आयटी हब ते शहराचा मध्यवर्ती भाग असा वेगवान आणि सुरक्षित प्रवास आता वास्तवात उतरणार आहे

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments