Homeभारतश्री अंबामाता मंदिराचा नवरात्रोत्सव उत्साहात; दररोज दहा हजार भाविकांनी घेतले दर्शन

श्री अंबामाता मंदिराचा नवरात्रोत्सव उत्साहात; दररोज दहा हजार भाविकांनी घेतले दर्शन

Newsworldmarathi Pune: सुखसागरनगर येथील श्री अंबामाता मंदिरात नवरात्रोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उत्सवात दररोज सुमारे दहा हजार भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. विधिवत पूजा, महाआरती, भजन संध्या, गरबा-दांडिया, होम-हवन आणि १५१ कन्यापूजन अशा विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवाला विशेष रंगत आली.

Advertisements

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिरात दररोज देवीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. भजन संध्या आणि गरबा-दांडियाच्या कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, होम-हवन आणि १५१ कन्यापूजनाचा धार्मिक सोहळाही श्रद्धापूर्वक पार पडला. श्री यल्लमा देवीची मिरवणूक हेही उत्सवाचे आकर्षण ठरले.

Advertisements

नवरात्रोत्सवादरम्यान श्री अंबामातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध नियमांचे पालन करत धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. उत्सवाच्या काळात स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले.

नवरात्रोत्सव संपन्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंदिर परिसरातील कमानी व फलक काढून परिसराची स्वच्छता करण्यात आली. धार्मिक उत्सवाच्या आयोजनाबरोबरच स्वच्छतेची जबाबदारीही विश्वस्त मंडळाने तत्परतेने पार पाडल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा, स्वच्छता आणि सुरक्षितता यांचा समन्वय साधत श्री अंबामाता मंदिराचा नवरात्रोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. उत्सवासाठी सहकार्य करणारे सर्व भाविक, सेवेकरी आणि संबंधितांचे विश्वस्त मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त मगराज राठी यांनी दिली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments