Homeपुणेमेहतर वाल्मिकी समाज मंदिर निशुल्क करण्याचा प्रस्ताव; नगरसेविका अर्चना पाटील यांचा पुढाकार

मेहतर वाल्मिकी समाज मंदिर निशुल्क करण्याचा प्रस्ताव; नगरसेविका अर्चना पाटील यांचा पुढाकार

Newaworldmarathi Pune : मेहतर वाल्मिकी समाजाच्या हितासाठी हरका नगर येथील समाज मंदिर पूर्णतः निशुल्क करण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी पुणे महानगरपालिकेकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर तसेच शहर सुधारणा समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक २२ (क) मधील हरका नगर परिसरात असलेले मेहतर वाल्मिकी समाजाचे समाज मंदिर हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच समाजातील बांधवांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि एकजूट वाढवण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरत आहे. समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांसाठी या समाज मंदिराची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

समाजाच्या वतीने हे समाज मंदिर निशुल्क उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही बाब अत्यावश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यावर सकारात्मक निर्णय घेऊन समाजाच्या हिताचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी मेहतर वाल्मिकी समाज पंचायतीचे सर्व सभासद उपस्थित होते. प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावा आणि समाज मंदिर पूर्णतः निशुल्क उपलब्ध व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून त्याला यश मिळत असल्याचे नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी सांगितले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments