Homeभारतस्वरस्वामिनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला...

स्वरस्वामिनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Asha Bhosle : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झाले आहे. शनिवारी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रमाणेच आशा भोसले यांनीही आपल्या सुरांनी संगीत क्षेत्राला सजवलं. त्यांनी कित्येक आयकॉनिक गाण्यांना आवाज दिला.

आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातून जितकं प्रेम मिळालं, तितकच त्यांचं वैयक्तिक आयुष्य दु:खात गेलं. वैविध्यपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशा ताईंना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आशा भोसले यांनी आपली बायोग्राफी ‘‘Asha Bhosle: A Life In Music’ मध्ये आपल्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. राम्या शर्मा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments