Newaworldmarathi Pune: आपण सुरक्षित आहोत ते केवळ भारतीय जवानांमुळे. ते तिथे आहेत म्हणून आपण आनंदी जीवन जगू शकतो. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून थांबणे पुरेसे नाही. तर आपापसातील मन आणि मतभिन्नता थांबवली पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे यासाठी माणसं जोडा,देश आपोआप जोडला जाईल असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक मा एकनाथ आव्हाड यांनी विविध उदाहरणं व कथेच्या माध्यमातून केले.
आधार सोशल ट्रस्ट पुणे आयोजित मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रिटींग कार्ड स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
गेली आकरा वर्षे आधार सोशल ट्रस्ट प्रत्यक्ष सीमेवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करते.फराळासोबत महाराष्ट्रातील विविध शाळांनी पाठवलेली आकर्षक ग्रिटींग कार्ड सैनिकांना दिले जातात. ते वाचताना त्यांच्या डोळ्यातील आसवं सर्व काही सांगून जातात.
देशाच्या दहा सीमांवर हा उपक्रम आधार सोशल ट्रस्ट राबवत आहे अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष चाकणकर यांनी दिली. अतीशय प्रतिकूल परिस्थितीत सैनिक सीमेवर तैनात असतात. आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भावना त्यांच्या पर्यत पोहचवणे गरजेचे असल्याचे विचार चाकणकर यांनी मांडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बि एस एफ असिस्टंट कमांडंट प्रतिक वशिष्ठ, राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर, नगरसेविका जयश्रीताई भूमकर, नगरसेवक सचिन मोरे, स्विकृत नगरसेवक निलेश कोंढाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर चांदगुडे साहेब,नारायण पाटील,शीतल चाकणकर, स्पर्धाप्रमुख सोपान बंदावणे उपस्थित होते.
यावर्षी महाराष्ट्र, बेळगाव व गोवा मिळून सतरा हजार ग्रिटींग प्राप्त झाले.ते सर्व ग्रिटींग सीमेवर प्रत्यक्ष देण्यात आल्याची माहिती स्पर्धा प्रमुख सोपान बंदावणे यांनी दिली.
यावेळी साईराज वाल्मिकी,दुर्गा पवार, संपदा दुधाट यांनी भावस्पर्शी भाषणे केली. यावेळी महाराष्ट्रातील १६५ शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांना तसेच १७५ विद्यार्थ्यांना आधार सोशल ट्रस्ट मार्फत सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष चाकणकर यांनी, आभार दत्तात्रय पाटील तर सूत्रसंचालन संदीप काकडे यांनी केले.



Recent Comments