Homeपुणेकै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर; ३०० हमाल बांधवांची डोळे तपासणी

कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर; ३०० हमाल बांधवांची डोळे तपासणी

Newsworldmarathi Pune: सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे, वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेश शहा यांनी केले.

Advertisements

जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित डोळे तपासणी शिबिर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, बीएमडी (बोन मिनरल डेन्सिटी) तपासणी तसेच रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Advertisements

या कार्यक्रमाला हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे, पुना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष दीपक बोरा, अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, पुणे हॉस्पिटलचे ट्रस्टी अशोक ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद पाटील, जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा, श्री पूना गुजराती बंधू समाजाचे खजिनदार हरीश शहा तसेच अमनोरा एस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरात मोठ्या प्रमाणावर हमाल बांधव आणि व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ३०० हमाल बांधवांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी करण्यात आली. याशिवाय ३० महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली आणि १८ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या आरोग्य उपक्रमाला व्यापारी, हमाल बांधव आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments