Homeक्राईमधक्कादायक! पुण्यात आयटी अभियंत्याचा मृत्यू; चिठ्ठीत दोन महिला सहकाऱ्यांची नावे असल्याचा उल्लेख,...

धक्कादायक! पुण्यात आयटी अभियंत्याचा मृत्यू; चिठ्ठीत दोन महिला सहकाऱ्यांची नावे असल्याचा उल्लेख, हिंजवडी हादरली

Newsworldmarathi Pune: गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील (Nashik) आयटी कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर, आता पुण्याच्या आयटी हब हिंजवडीमधून (Pune) एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका 48 वर्षीय आयटी (IT) अभियंत्याने आत्महत्या केली आहे. अमित ब्राम्हे असं या अभियंत्याचं नाव आहे. या धक्कादायक प्रकरणी नामांकित आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ही घटना 2 जून रोजी घडली असून 48 वर्षीय आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अमित यांच्या या टोकाच्या पावलामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहिलेल्या दोन पानांच्या सुसाईड नोटने कंपनीतील अंतर्गत छळाची भीषणता समोर आणली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत.

अमित ब्राम्हे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळाचा पाढाच त्यांनी या नोटमध्ये वाचला आहे. चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणे, जाणूनबुजून अत्यंत कठीण कामे देणे, इतर स्टाफसमोर वारंवार अपमान करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, असा छळ या दोन्ही महिला सहकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments