Homeपुणेपुणे मनपा शाळांच्या खासगीकरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध : प्रशांत जगताप

पुणे मनपा शाळांच्या खासगीकरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध : प्रशांत जगताप

Newaworldmarathi Pune :पुणे महानगरपालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याच्या प्रयत्नाला तसेच शिक्षणाच्या बाजारीकरणाला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे मनपाच्या काही शाळा आकांक्षा फाउंडेशनकडून मोफत चालवल्या जात आहेत. मात्र, यंदापासून या शाळांमधील त्यांची यंत्रणा कायम ठेवण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनला दरवर्षी १२ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मांडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Advertisements

आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर काँग्रेसकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. स्थायी समितीचे पुनर्गठन झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत प्रथमच एखाद्या प्रस्तावावर मतदान घेण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या शाळांसाठी आकांक्षा फाउंडेशनला एकूण १०८ कोटी रुपये देण्याचा प्रशासनाचा डाव असून या उधळपट्टीला काँग्रेसचा विरोध असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांकडून आधीच नऊ शाळा खासगी संस्थांना देण्यास आक्षेप असताना, आणखी काही शाळा खासगी संस्थांकडे सोपविण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मांडल्याचा आरोपही त्यांनी केला. एका शाळेसाठी सुमारे २२ कोटी रुपये खर्च होत असून भविष्यात या सर्व शाळांसाठी तब्बल ७७०० कोटी रुपयांची उधळपट्टी होऊ शकते, असा दावा जगताप यांनी केला.

या प्रस्तावाला काँग्रेसचे प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास टिंगरे, अमोल बालवडकर आणि वैशाली बनकर यांनीही विरोध दर्शविला. सर्वांना मोफत शिक्षणाचा हक्क मिळावा, मात्र त्यासाठी मनपाच्या शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments