Homeक्राईमबनावट मृत्युपत्र तयार करुन त्याद्वारे मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वकिलासह...

बनावट मृत्युपत्र तयार करुन त्याद्वारे मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वकिलासह वडिल, बहिणीवर गुन्हा NEW दाखल

Newsworldmarathi pune: आईचे बनावट मृत्युपत्र तयार करुन त्याद्वारे तिची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करुन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी वडिल, बहिणी आणि त्यांना मदत करणाऱ्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

कैलास आटोळे, निलिमा आटोळे, अॅड. सुधीर धर निरफारके Adv. Sudhir Madhur Nir (रा. घोरपडी पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत नेहा प्रसाद मानकर (वय ३२, रा. वीरभ्रदनगर, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहा मानकर यांचे वडिल आरोपी कैलास आटोळे आणि बहिण निलिमा आटोळे आहेत. त्यांची आई पद्मिनी कैलास आटोळे या फॅशन डिझायनिंगची कामे करीत होती. वडिल कैलास आटोळे यांनी त्यांच्या आईपासून पहिल्या लग्नाची हकीकत लपवुन ठेवून आईसोबत दुसरे लग्न केले होते. या कारणावरुन आई वडिलांमध्ये वारंवार वाद चालू असायचे. त्यांच्या आईने तिच्या स्वकष्टाने बाणेर येथील वीरभ्रदनगर येथील शिवालय बंगला, गावठाणात बिल्डिंग, बैठे घर, संस्कार अपार्टमेंटमधील राहता फ्लॅट, तसेच ४ ते ५ फ्लॅट, बालेवाडी गाव येथील बिल्डिंगमधील ६ फ्लॅट आणि पार्किंग, ३ गुंठे जागा पाषाण येथील वृंदावन रेसिडन्सीमधील एक फ्लॅट, खडकवासला येथील एक फ्लॅट अशी मिळकत कमावली आहे. २०१२ मध्ये फिर्यादी यांची सावत्र बहिण तृप्ती वीरकर हिने वडिलांच्या आणि आईच्या नावावरील संपत्तीमधून वाटा मागितला होता. कोर्टाने वडिलांच्या संपत्तीमधील वाटा तिला दिला. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांच्या संपत्तीमध्ये फिर्यादी बहिणी निलिमा आटोळे यांना समान हिस्यामध्ये वाटप करणारे मृत्युपत्र तयार करुन रजिस्टर केले. तिचे वडिल कैलास वाटोळे हे तिच्या मिळकतीचे येणारे भाडे मागत होते. त्यावरुन त्यांच्यात वाद होत होता. १० जानेवारी २०२६ रोजी त्यांची आई पद्मिनी आटोळे यांचे निधन आईच्या मृत्युनंतर तिचे वडिल तिला नॉमिनीपत्र व्या नावावर करण्यासाठी दबाव देऊ लागले. त्यांनी दाद दिली नाही म्हणून ते वारस नोंदीसाठी बाणेर तलाठीच्या कार्यालयात गेले. तेथे फिर्यादी यांनी हरकत घेतली.

फिर्यादी यांनी कोथरुड मंडल अधिकारी यांना आईचे नोंदणीकृत मृत्युपत्र दाखवले. त्यावेळी वडिलांनी खोटे मृत्युपत्र बनवितो आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या एकट्याच्या नावावर करुन घेतो, अशी धमकी दिली. मंडल अधिकारी फिर्यादी यांच्या बाजूने निकाल देत असताना वडिलांनी पुढील तारीख मागून घेतली. २९ एप्रिल २०२६ रोजी त्या दोघांनी खरोखरच त्यांच्या आईच्या निधन झाल्याअगोदरच्या तारखेचे तिच्या नावाचे अॅड. सुधीर मधुर निरफारके यांच्या कार्यालयात केलेले नोटराईड मृत्युपत्र मंडल अधिकारी यांच्याकडे सादर केले. त्यावरुन प्रॉपर्टी त्या दोघांचे नाव लावण्याची विनंती केली. त्या मृत्युपत्राची प्रत पाहिली असता वडिलांनी सादर केलेल्या मृत्युपत्रावर आईची सही खोटी होती. डॉक्युमेंटला कोणताही स्टॅम्प पेपर नव्हता. नोटराईझड डॉक्युमेंटला साक्षीदार अमित नांदे याचे २०१३ साली वय ३८ वर्ष होते आणि २०२५ साली देखील त्याचे वय ३७ वर्षच नमूद होते. डॉक्युमेंटची मेज नंबरीग चुकीची होती. फिटनेस प्रमाणाऱ्या डॉ. एरिक डेव्हिड याचा डॉक्टराचा परवाना २०२२ लाच संपलेला दिसला. तो डॉक्टरही आईच्या ओळखीचा नव्हता. ही बाब मंडल अधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन वडिलांनी खोटे मृत्युपत्र तयार केल्याचे दाखवून दिले. त्यामुळे मंडल अधिकाऱ्यांनी फिर्यादीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर वडिल व निलिमा यांनी त्याच NEW या दस्ताच्या आधारे २९ मे २०२६ रोजी हा दस्त गादणीकृत करुन घेतला आहे.

दरम्यान, कैलास आटोळे व निलिमा आटोळे यांनी त्याच्याविरुद्ध व त्यांच्या पतीविरुद्ध खोटेनाटे अर्ज करुन दोघांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी धमक्या आणि शिवीगाळ केली. या दरम्यान त्यांनी आईच्या नावाचे खोटे मृत्यु पत्र का तयार केले याबाबत विचारणा केली बनवुन असता त्या दोघांनी देखील त्यांना “आईने म चुक केली आहे, मी खोटे कागदपत्रे तयार केल, तुला घर सोडायला लावेल, तुला रस्त्यावर आणीन, तुला पाहून घेतो, “अशा धमक्या व शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांनी वडिल कैलास आटोळे, बहिण निलिमा आटोळे आणि त्यांना बनावट नोटरी करुन देणारा वकील अॅड. सुधीर मधर निरफारके यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. बाणेर सांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस NEW उपानेरीक्षक शैला पाथरे तपास करीत आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments