Newsworldmarathi Pune:वय वर्षे आठ, उंची तीन फूट, पण आत्मविश्वास आभाळाएवढा” – हे वर्णन तंतोतंत लागू पडते पुण्याची चिमुकली ‘बैले डान्सर’ फियोना भन्साळी
हिला. चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ सोसायटी ऑफ टीचर्स ऑफ डान्स’ इंडिया या प्रतिष्ठित राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वयोगट ७ ते ९ मध्ये ‘सोलो बैले’ गटात सुवर्णपदक पटकावून फियोनाने पुण्याच्या शिरपेचात नव्याने मानाचा तुरा खोवला आहे.
या स्पर्धेसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता अशा मेट्रो शहरांतील नामांकित डान्स अकादमींच्या २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ‘स्वान लेक’ या शास्त्रीय बैले प्रकारातील क्लिष्ट रचना फियोनाने अवघ्या २ मिनिट ३० सेकंदात अप्रतिमरित्या सादर केली.
तिची लवचिकता, तोल आणि चेहऱ्यावरील भाव पाहून आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी उभे राहून तिला दाद दिली. वयाच्या पाचव्या वर्षी सुरुवात, दिवसातून सलग तीन तास सराव असे उपक्रम असल्याची माहिती फियोनाची आई एकता भन्साळी ( प्रेसिडेंट जितो लेडी विंग) यांनी दिली, “फियोनाला लहानपणापासूनच डान्सची आवड होती.
वयाच्या पाचव्या वर्षी आम्ही तिला पुणे कैम्पमधे ‘ लेस डॅनसुस स्कूल ऑफ बैले’ मध्ये दाखल केले. तिच्या गुरू नेहा सुहजानी यांच्या मार्गदर्शनाखाली ती रोज शाळेनंतर सलग तीन तास सराव करते. शनिवार-रविवार तर दिवसभर स्टुडिओ मध्येच असते.”
“मला ब्लॅक स्वान बनायचे आहे” –
विजेतेपद पटकावल्यानंतर चिमुकल्या फियोनाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती म्हणाली, “मला बैले खूप आवडते. टीव्हीवर ‘ब्लॅक स्वान’ सिनेमा पाहिल्यापासून मला प्रोफेशनल बैले डान्सर व्हायचे आहे. माझ्या मम्मी-पप्पा आणि नेहा मॅममुळे मी जिंकू शकले. आता मला ऑस्ट्रेलियात जाऊन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायचा आहे.”
फियोना भन्साळी विजेती
“फियोना खूप कष्टाळू आणि शिस्तप्रिय आहे. बैलेसाठी लागणारी शारीरिक क्षमता आणि समर्पण तिच्यात उपजतच आहे. वयोवर्षं नऊ या गटात राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण जिंकणे ही पुण्यासाठी ऐतिहासिक घटना आहे. या जागतिक संस्थेने तिची दखल घेतली हे आमचे भाग्य आहे.”
प्रशिक्षक नेहा सुहजानी
पुण्यात बैले संस्कृतीला चालना
या यशामुळे पुण्यातील बैले डान्स कलाप्रकाराला नवी चालना मिळणार आहे. सामान्यतः पाश्चिमात्य देशांपुरता मर्यादित असलेला हा नृत्यप्रकार आता पुण्यातील पालक आणि मुले आवडीने शिकत आहेत. फियोनाच्या या यशानंतर या स्कूल ऑफ बैले’ मध्ये प्रवेशासाठी विचारणा वाढली.
पुढील लक्ष्य – वर्ल्ड चॅम्पियनशिप
सीएस्टीडी कॉमडान्स स्पर्धा जिंकल्यामुळे फियोना आता पुढील वर्षी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणाऱ्या ‘सिएस्टीडी’ वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप’ साठी थेट पात्र ठरली आहे. तिथे ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.


Recent Comments