Newsworldmarathi Pune: विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे करिअर सिरीज यशाच्या वेगळ्या वाटा या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स’ या एक महिन्याच्या मोफत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची सांगता बक्षीस समारंभाने करण्यात आली. बक्षीस वितरण व कौतुक सोहळा’ या कार्यक्रमांद्वारे जर्मन लँग्वेज A ग्रेड परीक्षेत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केले गेले.
तसेच दहावीच्या परीक्षेमध्ये 85 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या 31 विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महासंघातर्फे या मुलांना कमवा व शिका या योजने अंतर्गत जर्मनी मध्ये मोफत शिक्षण व स्टायपेंड सह जॉब मिळवण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका स्वरदा बापट आणि नगरसेविका स्वप्नाली पंडित उपस्थित होत्या . या कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे मुख्य कार्यवाहक समीर दरेकर यांनी केले.
जर्मन परीक्षेत ऋग्वेदी अरु, वेदांत जगताप, प्राजक्ता घोडके या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. अनन्या काळे, भार्गव घेनंद, सिद्धांत दरेकर, व आरव पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. शालेय मुलांसोबत ज्येष्ठ पालकांनी सुद्धा जर्मन भाषा शिकण्यात उत्साह दाखवला. पालकांपैकी विजया देशमुख, सुनील हांडे यांना आउटस्टँडिंग परफॉर्मर बक्षीस देण्यात आले. जर्मन भाषा प्रशिक्षक ट्रेनर नियाथ बनसोडे यांना 5 स्टार रेटिंग सह बेस्ट टीचर पुरस्कार देण्यात आला. इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी, महासंघातर्फे अँड.कल्पना मोरे, प्रीतम तिखे, फारुख तांबोळी, हर्षद छल्लारे, पुरुषोत्तम पंडित, विशाल बनसोडे आदींनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र. 1 च्या मुख्याध्यापिका वीणा नाईक मॅडम, डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन च्या मुख्याध्यापिका उज्वला कदम यावेळी उपस्थित होत्या.ज्येष्ठ शिक्षक जयवंत बोरसे सर, विष्णू सुर्वे सर आणि विठ्ठल भरेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महासंघातर्फे असे प्रशिक्षण वर्ग नियमितपणे घेण्यात येणार आहेत.


Recent Comments