Newaworldmarathi Pune: कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे , श्री.भरत अग्रवाल अध्यक्ष विश्वकर्मा ग्रुप व ट्रस्टी महालक्ष्मी मंदिर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष जयंत शहा,कार्यकारी संचालक डॉ.राजेश शहा, सहकार्यकारी संचालक नैनेश नंदू ,सचिव राजेंद्र शहा,खजिनदार हरेश शहा मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दहावी,बारावी व उच्चशिक्षित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भरत अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी भरत अग्रवाल म्हणाले की समाज माध्यमे तुमची विचार प्रक्रिया कुंठीत करून टाकतात तुमच्या विचारांची दिशा भरकटवून तुमचे विचार विश्व प्रदूषित करीत असतात.आपण कसे जगायचे कोणत्या दिशेने विचार करायचा याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिशा देण्याचे काम समाज माध्यमे करीत असतात.
तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे आपण तंत्रज्ञानासाठी नाही याची जाणीव प्रत्येक तरुणाने ठेवली पाहिजे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत कधी नव्हे ती कमालीची लवचिकता आल्याने त्या लवचिकेचा फायदा घेत व्यवसाय आणि छंद याची सांगड घालता आली पाहिजे. ध्येय निश्चित
करून केवळ आरंभशूरपणा न करता सातत्याने त्या दिशेने नागरिक मार्गक्रमण केल्यास संकल्पपूर्ती होते.भूतकाळात अपयश आले असल्यास ते विसरून यशावर लक्ष केंद्रित करा असे त्यांनी सांगितले.
डॉ.राजेश शाह म्हणाले की,गुजरात समाज हा उद्योगाचा समाज म्हणून सुपरीचित आहे उद्योगजगतात सचोटीने काम करीत नाव कमावलेल्या अनेक जण आपल्या समाजात आहेत. भविष्यात उद्योगाला शिक्षणाची जोड देत बुद्धिजीवी क्षेत्रात देखील आपल्या समाजाचे उदाहरणे प्रस्थापित केली
पाहिजेत. यशाला मर्यादा नसतात एका यशा प्राप्तीनंतर पुढचा ध्येय आपल्याला खुणावत असते आणि ही सातत्याने सुरू राहणारे प्रक्रिया आहे.
या समारंभास ट्रस्टी हेमंत मेहता,जनक शाह,केतन कापडिया,विनोद देडिया,दिलीप मेहता व सौ.हंसा शाह आणि सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.या वर्षीपासून विशेष स्पोर्ट्स कॅटेगिरी मध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
नैनेश नंदू यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय केला,राजेंद्र शहा यांनी आभार प्रदर्शन मांडले. अनुजा सेलोट यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments