Homeक्राईमनसरापूर अत्याचार प्रकरण; आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा

नसरापूर अत्याचार प्रकरण; आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा

Newsworldmarathi Pune: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने ६५ वर्षीय नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला मरेपर्यंत फाशीची ठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे.

Advertisements

नसरापूर अत्याचार प्रकरण कोर्टात काय घडलं?
न्यायालयाने गुरुवारीच भीमराव कांबळे याला पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर आज शिक्षेच्या तीव्रतेवर अंतिम सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. कोर्टाने मागील वेळच्या सुनावणीत आरोपीलाच विचारलं होतं, की तूच सांग तुला काय शिक्षा द्यायला हवी? यावेळी आरोपीने मौन बाळगले. यानंतर त्याने पुन्हा कोर्टात खोटी कहाणी सांगत बनाव रटला. मात्र, न्यायाधीशांनी त्याला फटकारत दोषी ठरवलं. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसोबत केलेले कृत्य अतिशय क्रूर आहे आणि त्याच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आज त्याला ही शिक्षा सुनावली.

Advertisements

महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे ही काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेनंतर अख्ख्या महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष तपास पथक स्थापन केले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांच्या आत १,२०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

राज्यातील सर्वात वेगवान खटला
विशेष न्यायालयाने २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती. सरकारी पक्षाने अत्यंत वेगाने पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषकांसह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. २० जून रोजी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला होता. अखेर आज कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावताच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments