Newsworldmarathi Pune: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ही भारतातील प्रमुख सुपरक्रॉस रेसिंग लीग, आपल्या तिसऱ्या हंगामासाठी पुनित बालन ग्रुपचे (PBG) नवीन फ्रँचायझी म्हणून अभिमानाने स्वागत करत आहे. पीबीजी रेसिंग या नवीन फ्रँचायझीच्या माध्यमातून पुनित बालन ग्रुपने भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच, देशातील उदयोन्मुख क्रीडा परिसंस्थांचे एक प्रमुख केंद्र म्हणून पुण्याचे वाढते महत्त्व यातून अधिक अधोरेखित होत आहे.
प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट निर्माते आणि क्रीडा क्षेत्राचे पुरस्कर्ते पुनित बालन यांच्या नेतृत्वाखालील ही नवीन फ्रँचायझी, सुपरक्रॉस
रेसिंगमध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, युवा विकास आणि मोठ्या प्रमाणावरील लीग सहभाग यांचा वारसा घेऊन येते. क्रिकेट, बुद्धिबळ, टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो-खो, बॅडमिंटन आणि आर्म रेसलिंग यासारख्या खेळांमध्ये यशस्वी गुंतवणूक आणि मालकी हक्क असलेल्या पुनित बालन ग्रुपचे आयएसआरएल मधील हे आगमन, भारतातील क्रीडा क्षेत्रातील पुढील पिढीसाठी संधी निर्माण करण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या ध्येयातील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
आयएसआरएलमध्ये पीबीजी रेसिंगचा समावेश झाल्यामुळे महाराष्ट्रातील लीगचे स्थान अधिक भक्कम होईल आणि त्याचबरोबर भारतीय सुपरक्रॉसमध्ये क्रीडाप्रेर्मीचा एक नवीन वर्ग आणि चाहत्यांसाठी सहभागाच्या (फॅन एंगेजमेंट) नवनवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
‘तरुणांच्या प्रतिभेला प्रेरणा देण्यासाठी आणि मजबूत समुदाय उभारण्यासाठी खेळ हे नेहमीच एक प्रभावी माध्यम राहिले आहे; आणि याच विचारसरणीने गेल्या काही वर्षात आम्ही क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक गुंतवणुकीला दिशा दिली आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) हे भारतातील रेसिंग क्षेत्रातील एका रोमांचक नवीन पर्वाचे प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे शहर, येथील
उत्साही चाहते आणि रेसिंगभोवती विकसित होत असलेल्या संस्कृतीमुळे देशातील सक्रिय मोटरस्पोर्ट हबपैकी एक म्हणून वेगाने उदयास आले आहे. सीझन 3 साठी ISRL मध्ये सहभागी होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही अशा एका फ्रँचायझीची उभारणी करण्यास उत्सुक आहोत जी भारतीय रेसिंगचा ध्यास, उत्कृष्ट कामगिरी आणि त्यातील उत्साह यांचे प्रतिबिंब असेल; तसेच, या माध्यमातून देशातील मोटरस्पोर्टच्या दीर्घकालीन विकासालाही आम्ही हातभार लावू, असे पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी म्हटले आहे.
आयएसआरएलचे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “तिसऱ्या हंगामासाठी पुनित बालन ग्रुपचे ISRL परिवारात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. भारतीय खेळ तसेच विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या विकासासाठी पुनित बालन यांची असलेली वचनबद्धता, जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था उभारण्याबाबतच्या त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. सुपरक्रॉसला भारताच्या मुख्य प्रवाहातील क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांवरती, ISRL मध्ये त्यांचा झालेला प्रवेश ही या लीगची प्रगती आणि क्षमता यावरील आणखी एक महत्त्वपूर्ण मोहोर आहे. ही नवीन फ्रँचायझी चाहते तसेच रेसिंग क्षेत्रातील मंडळींमध्ये नवा उत्साह निर्माण करेल. या संयुक्त प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधत इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सातत्याने वेगाने प्रगती करत आहे. ISRL मध्ये पुनित बालन ग्रुपचा प्रवेश हा भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील वाढती व्यावसायिक गती आणि या लीगच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर आघाडीचे गुंतवणूकदार तसेच क्रीडा क्षेत्रातील उद्योजकांचा वाढता विश्वास दर्शवतो.
हा तिसरा सीझन पूर्वीपेक्षा अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक तसेच अविस्मरणीय अनुभव देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे; त्यादृष्टीने आयएसआरएल अशी एक फ्रँचायझी यंत्रणा विकसित करत आहे, जिथे उच्च-स्तरीय रेसिंगचा थरार, मनोरंजन आणि चाहत्यांचा अनुभव यांचा सुरेख मेळ घातला जातो.
या उत्साहात सहभागी व्हा आणि सोशल मीडियावर #Flirt With Dirt याच्यासह ISRL ला फॉलो करा


Recent Comments