HomeपुणेParth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात...

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!

Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार (Parth Pawar engagement) आणि कायनात दारा (Kaiynaat Dara) यांचा साखरपुडा आज पुण्यात होत आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता साखरपुड्याचा मुहूर्त नियोजित आहे. या साखरपुडा सोहळ्यासाठी खास पण मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

Advertisements

पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा यांचा हा साखरपुडा सोहळा येरवडा येथील हॉटेल द रिट्स कार्लटोन येथे होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 40 आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध पक्षातील 15 खासदारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे, सुधा मूर्ती, सी एम रमेश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योजक मोहित कंबोज यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. तसेच या साखरपुड्याला काही विशेष पाहुण्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना साखरपुड्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Advertisements

विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार
खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी आज (बुधवारी, ता२९) साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील आहेत, व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments