Homeपुणेपुणे शिवसेनेला नवा चेहरा; हेमंत बागुल यांच्यावर युवासेना महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी

पुणे शिवसेनेला नवा चेहरा; हेमंत बागुल यांच्यावर युवासेना महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी

Newsworldmarathi Pune: पुण्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा नेतृत्व हेमंत बागुल यांच्यावर शिवसेनेकडून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची युवासेना पुणे महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे शहरातील शिवसेना संघटनेला नव्या दमाचे नेतृत्व मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Advertisements

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यभरात संघटनात्मक बांधणीवर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हेमंत बागुल यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगला संपर्क, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य यामुळे बागुल यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला आहे.

Advertisements

युवासेना महानगर अध्यक्ष म्हणून बागुल यांच्यासमोर पुण्यात युवकांना पक्षाशी जोडणे, संघटन विस्तार करणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेमंत बागुल यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुण्यातील शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, तसेच युवकांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात बागुल यांच्या नेतृत्वाखाली युवासेना शहरात विविध सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताचे उपक्रम राबविणार असल्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments