Newsworldmarathi Pune: आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे मानवी मन विविध चिंता, नकारात्मक विचार आणि मानसिक तणावाने ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्याल, माउंट अबू यांच्या वतीने विशेष प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटर, कोंढवा येथे गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हे व्याख्यान होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मोटिवेशनल स्पीकर, विश्वविक्रम धारक आणि माईंड ट्रेनर डॉ. बी. के. शक्तीराज हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सरिता दीदी आणि सुजाता दीदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पूना गुजराती बंधू समाज व जयराज क्लबचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राजेश शहा यांनी केले आहे.


Recent Comments