Newsworldmarathi Pune: पुण्याच्या भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील २० वर्षीय श्रेया चंद्रकांत हंचाटे या दंतवैद्यकीय विद्यार्थिनीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दातांमधील कीड दाखवण्यासाठी विकसित केलेल्या ‘श्री-डी कॅरिअस टूथ मॉडेल’ या नाविन्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडून डिझाइन पेटंट प्राप्त झाले आहे.
प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसोबत काम करताना दातांमधील किडीची वाढ टप्प्याटप्प्याने स्पष्ट करण्याची गरज श्रेया यांच्या लक्षात आली. त्यातून त्यांनी हे मॉडेल विकसित केले. या मॉडेलमध्ये दातांच्या किडीचे विविध टप्पे सहज समजावून सांगता येतात. तसेच विद्यार्थ्यांना प्री-क्लिनिकल सराव आणि रुग्णांच्या काऊन्सिलिंगसाठीही हे मॉडेल उपयुक्त ठरणार आहे.
मॉडेलमध्ये दातांवरील किडीपासून होणारे नुकसान स्पष्टपणे दाखवण्यात आले असून, किडीची सुरुवात, तिची वाढ आणि दातांवर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजण्यास मदत होते. विशेषतः दंतवैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी हे मॉडेल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या संशोधनासाठी सहकारी प्राध्यापकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर श्रेया यांनी डिझाइनसाठी अर्ज केला होता. पेटंट मिळाल्याने त्यांच्या संशोधनाला मोठी चालना मिळाली असून, दंतवैद्यकीय शिक्षण अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


Recent Comments