Homeपुणेविद्यार्थ्यांचे प्रश्न, रोजगार आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार : रुपेश...

विद्यार्थ्यांचे प्रश्न, रोजगार आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार : रुपेश उंबरकर

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा संकल्प; सामान्य कुटुंबातील विद्यार्थी, शिक्षक आणि सुशिक्षित तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार

Advertisements

Newsworldmarathi Pune : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार उंबरकर रुपेश शिवाजी (उमेदवार क्रमांक २२) यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न, सुशिक्षित तरुणांचा रोजगार, शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत ठामपणे आवाज उठवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या उमेदवाराने विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांपासून पदवीधरांपर्यंत विविध घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.

Advertisements

आज राज्यातील सुशिक्षित तरुणांसमोर रोजगाराच्या मर्यादित संधी, पारदर्शक भरती प्रक्रिया आणि परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आणि पदवीधरांच्या प्रश्नांनाही विधिमंडळात योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. या सर्व प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे उंबरकर यांनी नमूद केले.

“माझ्याकडे मोठ्या राजकीय नेत्यांची ताकद नसेल; मात्र सामान्य माणसाच्या संघर्षाची जाणीव, प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस आहे. विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत ठामपणे मांडणे, हे माझे प्रमुख ध्येय आहे,” असे उंबरकर यांनी सांगितले.

ही निवडणूक केवळ एका उमेदवाराची नसून, पदवीधरांच्या प्रश्नांना प्रभावी प्रतिनिधित्व मिळवून देण्याची संधी असल्याचे त्यांनी म्हटले. मतदारांनी उमेदवारांची भूमिका, कामाचा दृष्टिकोन आणि प्रश्न सोडवण्याची बांधिलकी लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

२३ ऑक्टोबरला मतदानाचे आवाहन

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात उमेदवार उंबरकर रुपेश शिवाजी यांच्या नावासमोरील उमेदवार क्रमांक २२ ओळखून प्रथम पसंतीचा क्रमांक ‘१’ नोंदवून पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

“आपला उमेदवार, आपला आवाज, आपला विश्वास!” या घोषवाक्यासह उंबरकर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पदवीधरांचे प्रश्न व्यापक स्तरावर मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments