Homeपुणेपुणे फेस्टिव्हलचा पुरस्कार हा जणु माहेरवाशिणीचा गौरव

पुणे फेस्टिव्हलचा पुरस्कार हा जणु माहेरवाशिणीचा गौरव

Newsworldmarathi pune :पुणे फेस्टिव्हलच्या सुरवातीपासून मी या महोत्सवाचा भाग आहे. उद्घाटनापासून ते एकल सादरीकरणापर्यंत, मी या महोत्सवात नृत्यसेवा केली आहे. त्यामुळे मी स्वतःला पुणे फेस्टिव्हल कुटुंबाचा एक घटक मानते. मला दिलेला पुरस्कार मी माहेरवाशिणीचा गौरव म्हणून विनम्रतेने स्वीकारते, असे उद्गार प्रसिद्ध नृत्यगुरू, नृत्यांगना डाॅ. स्वाती दैठणकर यांनी शनिवारी येथे काढले.

Advertisements

पुणे फेस्टिव्हलतर्फे ‘नृत्य झंकार’ ही महिलांची नृत्य स्पर्धा शनिवारी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना व नृत्यगुरू स्वाती दैठणकर यांना पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हल ‘नृत्यगुरू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, उपरणे आणि पुष्पगुच्छ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलच्या चेअरपर्सन मीरा सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक अॅड अभय छाजेड, विश्वस्त मोहन टिल्लू, माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक सुनील शिंदे, स्पर्धा संयोजक संयोगिता कुदळे तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून पोलिस निरीक्षक शीतल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

दैठणकर म्हणाल्या, माझे कलाशिक्षण मुंबईत झाले, पण लग्नानंतर मी पुण्यात आले आणि आमचे सारे कुटुंबच पुणे फेस्टिव्हलचा एक भाग झाले. कलाकार म्हणून पुण्याने मला स्वीकारले. आपली गुरु-शिष्य परंपरा ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. संस्कृतीचा, कलेचा प्रवाह या परंपरेमुळे अखंडित आणि प्रवाही राहतो. गुरुंनी जे दिले, ते स्वतः जपून, त्यात भर घालण्याचा प्रयत्न करत, ते पुढील पिढीकडे सुपूर्द करणे, ही कलाकाराची जबाबदारी असते. ती जबाबदारी मी स्वीकारली असून, यथाशक्ती एक व्रत म्हणून पुढील पिढीकडे सोपविण्याचा प्रयत्न करते आहे. हा पुरस्कार मी त्याच भावनेने स्वीकारते आहे.

गोयल म्हणाले, आपली संस्कृती, परंपरेचा वारसा जपण्याचे कार्य पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून केले जात आहे. तीच महोत्सवाची ओळख आहे आणि स्वाती दैठणकर हीच ओळख जपण्याचे, पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत.

याप्रसंगी नृत्यस्पर्धेचे परीक्षक पूजा वाघ, डाॅ. जतीन पांडे व आकृती शृंगारे यांचाही गौरव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. रत्ना दहीवेलकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर नृत्यस्पर्धेतील सादरीकरणे झाली.
पुणे फेस्टिव्हल नृत्य झंकार स्पर्धेत एकल आणि समूह नृत्य अशा दोन प्रकारांचा समावेश होता. एकल नृत्य स्पर्धा २० ते ३५ आणि ३६ ते ५० वर्षे अशा दोन वयोगटांत, समूह नृत्य स्पर्धेसाठी २० ते ५५ वर्षे हा वयोगट होता. प्रत्येक समूहात ५ ते ८ महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत बॉलीवूड, लावणी, कथ्थक, फ्युजन आदी विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण झाले.

नृत्य स्पर्धेचा निकाल

एकल वयोगट 20 ते 35

स्नेहल साधू- प्रथम

तनुजा गोडे – द्वितीय

एकल वयोगट 36 ते 50

श्वेता जाधव -प्रथम

पल्लवी लोंढे – द्वितीय

स्नेहल राक्षे – तृतीय

समूह नृत्य

भावना’ज डान्स ग्रुप – प्रथम

माय डान्स अकॅडमी- द्वितीय

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments