Homeपुणेश्री महालक्ष्मी मंदिरातील 'शृंगार' या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन

श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘शृंगार’ या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन

Newsworldmarathi Pune: श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंदिरामध्ये साकारलेल्या ‘शृंगार’ संकल्पनेवर आधारित भव्य सजावट व विद्युत रोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार देखील या संकल्पनेवर साकारले असून ते पाहण्याकरिता देवी भक्तांनी मोठी गर्दी केली.

Advertisements

यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. मंदिरासह परिसरात साकारण्यात आलेली विद्युत रोषणाई देखील भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

Advertisements

यंदाच्या नवरात्रोत्सवात ‘शृंगार’ या संकल्पनेवर आधारित सजावट मंदिरामध्ये व भव्य प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. यामध्ये मंगळसूत्र, जोडवी, हिरवा चुडा, नथ, कोल्हापुरी साज, ठुशी, तन्मणी, पैंजण, पाटल्या, मोहनमाळ, बोरमाळ यांसह विविध प्रकारचे दागिने आणि सौभाग्यलंकार यांच्या सुरेख प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरामध्ये विविध खांबावर देखील या प्रतिकृती पाहायला मिळतात.त्यामुळे ही सजावट देवीभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

*यंदाचे वैशिष्ट्य : अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक, जिवंत देखावा*
मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. तसेच ललिता पंचमीला गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता कन्यापूजन कार्यक्रम आणि शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी गाथा शिवशंभूंची हा जिवंत देखावा ही यंदाच्या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. तरी देवीभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments