Homeपुणेपुणे नवरात्रौ महोत्सवात मराठी-हिंदी चित्रपटगीतांची रंगली बेधुंद मैफल

पुणे नवरात्रौ महोत्सवात मराठी-हिंदी चित्रपटगीतांची रंगली बेधुंद मैफल

Newsworldmarathi pune : विविध भावभावना व्यक्त करणारी, प्रत्येक पिढीच्या भावना जागवणारी अशी मराठी आणि हिंदी चित्रपटगीतांची मैफल मंगळवारी रंगली. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतासह पाश्चात्त्य संगीताचा फ्लेवरही या मैफिलीने रसिकांना दिला.

Advertisements

३२ व्या पुणे नवरात्र महोत्सवाच्या तिसर्या माळेची सायंकाळ हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या गीतांमुळे लक्षणीय ठरली. नेहरू स्टेडियम येथील गणेश कला क्रीडा रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात कृष्णधवल काळापासून ते रंगीत चित्रपटांच्या काळापर्यंतचा सांगीतिक प्रवासही रसिकांना अनुभवता आला.

कला, संस्कृती आणि संगीताचा संगम साधणार्या पुणे नवरात्रौ महोत्सवात आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांच्या पुढाकाराने बॅलिवुड आल टाईम हिट्स हा कार्यक्रम टीएमडी यांनी प्रस्तुत केला.

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून देवीस्तुतीपर रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आई भवानी, लल्लाटी या गीतांनी भक्तीरसपूर्ण वातावरण निर्माण केले. त्यानंतर अधीर मन झाले, मै हूॅ झुम झुम झुमरू, ये दिल ना होता बेचारा, आज की रात मजा हुस्न का, इक हसीना थी, मला वेड लागले प्रेमाचे, देखा एक ख्वाब तो ये, परदेसियों ये सच है पिया, पर्दा है पर्दा, किशोरकुमार यांच्या गीतांचा मेडले, मुझे नौलाखा मंगादे, साजणी, डिपाडी डिपांग, यारा हो यारा ईष्कने मारा, लागा चुनरी मे दाग, ऐसी दिवानगी, यारी है ईमान मेरा, परदेसी परदेसी, जय जय शिवशंकर, गुलाबी आंखे, दम मारो दम, उदे गं अंबे उदे…अशी विविधरंगी मराठी – हिंदी गीते रसिकांना स्मरणरम्य काळात घेऊन गेली. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना भरभरून दाद मिळाली.

तेजस्विनी आहुजा, माधुरी भोसेकर, चंद्रशेखर महामुनी, आकाश सोळंकी, पियुष भोंडे या गायक कलाकारांनी समरसून सादर केलेल्या या गीतांना, अमन सय्यद, आसिफ खान, आसिफ इनामदार, हर्षद गनबोटे, सॅम्सन चंदनशिव या कलाकारांनी वाद्यांची साथसंगत केली. वाद्यवृंद संचलन मुकेश देढिया यांनी केले. आकाश सोळंकी यांनी गायनासह निवेदनही केले.

याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल यांच्यासह डाॅ. सतीश देसाई, किशोर सरपोतदार, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, घनश्याम सावंत, विलास रत्नपारखी, रमेश भंडारी आदी उपस्थित होते. जयश्री बागुल आणि पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments