मलेशिया चॅम्पियनशिप रॅली विजेती ठरली निकिता टकले खडसरे
Newsworldmarathi Pune : मलेशिया मध्ये मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता टकले खडसरे या युवतीने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले. तब्बल साडेतीनशेहून अधिक रॅलीमध्ये सहभाग नोंदविलेल्या मुसा शरीफ निकिताचा सहचालक होता. राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेली निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली. स्पर्धेच्या चार विभागात निकिताने ट्रॉफी मिळविली आहे.
एम.आय.आर.सी रॅली ऑफ आशान, मलेशिया मध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, चायना देशातील सुमारे 22स्पर्धक सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय, राष्ट्रीय, पातळीवर स्पर्धेत अनेक वेळा भाग घेतला, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचनींना निकिताला सामोरे जावे लागले, त्यात भाषा, तंत्रज्ञान, नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागले, रॅली सूरु झाल्यावर पहिल्याच स्टेजमध्ये एक किलोमीटरला इलेक्ट्रिक समस्या झाली, कार दुरुस्त केली पुन्हा रॅलीत सहभागी होऊन पूर्ण केली, यामध्ये नऊ स्टेजमध्ये जास्त गुण मिळवून निकिताने सर्व समस्यांवर मात करत चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविली, सुमारे 365 रॅली त्यातील 86 आंतरराष्ट्रीय रॅलीत सहभाग असल्याने सहचालक मुसा शरीफ यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाल्याचे निकिता आवर्जून सांगते.
दोन दिवसीय रॅलीमध्ये पाऊस असल्याने खूप उष्ण वातावरण निर्माण झाले होते, उष्माघात चा त्रास अनेकांना सहन करावा लागला, वातावरण रॅलीसाठी उपयुक्त नव्हते, अशा परिस्थिती मध्ये नवखी आणि प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या निकिताने यश मिळविले, मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवघड रॅली मानली जाते, या रॅलीत सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात, त्यामुळे या रॅलीला अधिक महत्व आहे.
पामच्या झाडांमधून कार चालविताना फार सावध भूमिका घेत सहचालक मुसा शरीफ यांच्या सहकार्याने निकिता टकले खडसरेने चॅम्पियनशिप रॅलीत भारताचा झेंडा फडकविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळविणारी निकिता पहिली स्पर्धक ठरली आहे.
आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केलेले संजय टकले, गौरव गिल, अरोर अर्जुन राव, कर्णाकदूर यांच्या रांगेत बसण्याचा मान निकिता टकले खडसरेने मिळविला आहे.
राष्ट्रीय स्तरावर अनेक रॅली जिंकल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री यांचा मोलाचा वाटा असल्याचे निकिता आवर्जून सांगते. तसेच आंतरराष्ट्रीय डब्ल्यू आर सी रॅली जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला
मा. नगरसेविका अर्चना पाटील यांचे काम कौतुकास्पद : केंद्रीय मंत्री मोहोळ
Newsworldmartahi pune : भवानी पेठ परिसरामध्ये अनेक विकास कामे नगरसेविका अर्चना पाटील यांनी त्वरित मार्गी लावली आणि भवानी पेठेचा कायापालट केला. आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे कामही त्यांनी केले असे गौरव उद्गार खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या मा. अध्यक्षा व मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेष कॅलेंडरचे प्रकाशन पुण्यनगरीचे लाडके खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
हे विशेष कॅलेंडर लवकरच भवानीपेठ परिसरात वितरित केले जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी दिली.
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील, डॉ. अमोल देवळेकर, सुमित नेमजादे, सतीश साठे, व युवराज आडसुळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राजक्ता माळीला आहे हे व्यसन….
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील एक गुणी अभिनेत्री असून, तिच्या अभिनय, नृत्यकौशल्य, तसेच होस्टिंगमधील खास शैलीमुळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा भाग राहते. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी शोचे होस्टिंग करत आहे. तिच्या विनोदी आणि मोजक्या, पण प्रभावी कमेंट्समुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि वक्तव्यांमुळेही प्राजक्ता सातत्याने चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या प्रवासाविषयी आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती दिली. तिच्या कामातील समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे ती मराठी मनोरंजन विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.
तिच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण कलाकार मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्यास प्रोत्साहित होताना दिसतात. प्राजक्ता माळीची ऊर्जा, तिचा उत्साह, आणि विविध कलाकृतींमधील प्रयोगशीलता यामुळे ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
प्राजक्ता माळीने तिच्या मुलाखतीत दिलखुलासपणे स्वतःच्या आवडी-निवडी आणि सवयींविषयी सांगितले, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी पैलू समोर आले. तिने म्हटल्याप्रमाणे, ती एक फूडी आहे, आणि जर ती अभिनेत्री नसती, तर तिचे वजन ७० किलो झाले असते. यावरून तिचा खाद्यप्रेमी स्वभाव स्पष्ट होतो.
तिने तिच्या तूळ राशीशी संबंधित खास निरीक्षणही शेअर केले, की तूळ राशीच्या व्यक्तींना एक तरी व्यसन असते. तिच्यासाठी हे व्यसन चहाचे आहे. प्राजक्ताने कबूल केले की तिला चहाचा त्रास होतो, तरीही ती चहा सोडू शकत नाही. मात्र, ती रोज फक्त दोनच कप चहा घेते.
तिच्या या विधानांमधून तिचा प्रामाणिकपणा आणि सामान्य जीवनाशी जोडलेला स्वभाव जाणवतो. तिच्या या गोष्टींमुळे तिच्या चाहत्यांना तिच्या व्यक्तिमत्त्वाशी नाते जोडण्यास सोपे जाते आणि ती आणखी प्रिय ठरते.
तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि वक्तव्यांमुळेही प्राजक्ता सातत्याने चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या प्रवासाविषयी आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती दिली. तिच्या कामातील समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे ती मराठी मनोरंजन विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.
तिच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण कलाकार मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्यास प्रोत्साहित होताना दिसतात. प्राजक्ता माळीची ऊर्जा, तिचा उत्साह, आणि विविध कलाकृतींमधील प्रयोगशीलता यामुळे ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
प्राजक्ता माळीने तिच्या मुलाखतीत दिलखुलासपणे स्वतःच्या आवडी-निवडी आणि सवयींविषयी सांगितले, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी पैलू समोर आले. तिने म्हटल्याप्रमाणे, ती एक फूडी आहे, आणि जर ती अभिनेत्री नसती, तर तिचे वजन ७० किलो झाले असते. यावरून तिचा खाद्यप्रेमी स्वभाव स्पष्ट होतो.
तिने तिच्या तूळ राशीशी संबंधित खास निरीक्षणही शेअर केले, की तूळ राशीच्या व्यक्तींना एक तरी व्यसन असते. तिच्यासाठी हे व्यसन चहाचे आहे. प्राजक्ताने कबूल केले की तिला चहाचा त्रास होतो, तरीही ती चहा सोडू शकत नाही. मात्र, ती रोज फक्त दोनच कप चहा घेते.
तिच्या या विधानांमधून तिचा प्रामाणिकपणा आणि सामान्य जीवनाशी जोडलेला स्वभाव जाणवतो. तिच्या या गोष्टींमुळे तिच्या चाहत्यांना तिच्या व्यक्तिमत्त्वाशी नाते जोडण्यास सोपे जाते आणि ती आणखी प्रिय ठरते. बलूनमुळे प्रदूषणाचा धोका; पुणेकरांनी केली कारवाईची मागणी
Newsworldmarathi Pune : पुणे शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर बलून सोडण्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.
पर्यावरणप्रेमी अनंत रामचंद्र घरत, अध्यक्ष- माय अर्थ संस्था आणि सदस्य- एन्वायरनमेंट क्लब ऑफ इंडिया, यांनी एका सविस्तर पत्राद्वारे प्रशासनाकडे ही तक्रार नोंदवली. त्यांनी बलून सोडण्याच्या प्रथेमुळे जलप्रदूषण, वन्यजीवांना धोका, नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा, हवामान प्रदूषण, आणि कचरा निवारणाच्या समस्या यावर भर दिला आहे.
पत्रात नमूद केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार, बलून हवेत सोडल्यावर अनेकदा जलाशयात किंवा जमिनीवर पडतात. यामुळे जलचर प्राण्यांवर प्रतिकूल परिणाम होतो. बलूनचे तुकडे गिळल्याने मासे, पक्षी, आणि प्राणी मृत्युमुखी पडतात. लॅटेक्स किंवा फॉयल बलूनच्या विघटनास अनेक वर्षे लागतात, त्यामुळे हे कचऱ्याचे प्रमाण वाढवतात.
बलून सोडणे हे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ आणि पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या नियमांचे उल्लंघन असल्याचेही या पत्रात नमूद आहे. याशिवाय, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, ज्यावरही बलून सोडण्यामुळे विपरित परिणाम होतो.
सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये बलून सोडण्यावर प्रतिबंध. पर्यावरणीय परिणामांविषयी जनजागृती मोहिम. पर्यावरणपूरक पर्यायांचा प्रसार, जसे बायोडिग्रेडेबल सजावट. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी. बलून सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा मागण्या घरत यांनी प्रशासनालाकडे केल्या आहेत.
तक्रारीत पुढे नमूद केले आहे की, पुणे महानगरपालिका या समस्येवर तातडीने कार्यवाही न केल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) दाद मागण्यात येईल.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन
Newsworldmarathi Delhi : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
सरसत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती. यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे.
मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. तर ते 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
पंतप्रधान मोदींकडून फोनवरुन सिंह यांच्या कुटुंबियांची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच अनेक दिग्गज नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहे. पोलिसांकडून आता दिल्लीतील एम्स रुग्णालयाचा परिसर मोकळा करण्याचं काम सुरु झालं आहे.
48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर
Newsworldmarathi Pune : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर (MLA Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांचं काही नऊ डिसेंबरला अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिवाय हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू होता. काहींना अटक देखील करण्यात आली होती. काल (बुधवारी) पोलीस तपासात (Pune Crime) सर्वात मोठा खुलासा समोर आला. शेजाऱ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देऊन पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांची त्यांच्या पत्नीनेच पैसे देऊन हत्या करायला लावली आहे. मोहिनी वाघ (Mohini Wagh) असं या प्रकरणातील आरोपी पत्नीचे नाव आहे. दरम्यान ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत मोहिनी वाघचे असलेल्या अनैतिक संबंधातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र, सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हीला काल (बुधवारी) अटक केली आहे. मोहिनी वाघचे वय सध्या 48 वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे. अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र होता. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र, सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते.अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याची माहिती आहे.
सतीश तात्याबा वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. त्या वेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यासंबधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला. मोहिनी वाघने अक्षयला नवरा सतीश यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत सहभागी करून घेतले.अक्षयने आरोपींना दीड लाखाची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार टिळेकरांच्या मामीनेच दिली मामाची सुपारी….
Newsworldmarathi Pune : Breaking News पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर झालेल्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.
सोमवारी सकाळी सतिश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आले आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती . पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पुण्यातील मांजरी परिससरात ९ डिसेंबरला पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. पण हत्येचे नेमकं कारण समोर आले नव्हते. अखेर दीड महिन्यानंतर हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याच उघड झाले. सतिश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं होते. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
ऐतिहासिक वास्तू खराब करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा : आ. गोऱ्हे
Newsworldmarathi Pune : ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले यांचे सौंदर्य खराब करणाऱ्यांना आता ३ ते ५ वर्षांची शिक्षा होईल. नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी कमी शिक्षा होती, त्यामुळे काेणावर धाक नव्हता. गड-किल्ले यांचे सौंदर्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. पुण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत डॉ. गोऱ्हे यांनी अधिवेशनात झालेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.
डाॅ. गाेऱ्हे म्हणाल्या, विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण १७ विधेयके मंजूर झाली. तब्बल ३३ वर्षांनंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनात इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला. कारागृहांच्या संदर्भातील विधेयक, सिद्धिविनायक मंदिराच्या समिती सदस्यांची मुदत ३ वर्षांपासून ५ वर्षे करण्याचा निर्णय, तसेच सदस्यसंख्या ९ वरून १५ करण्याचा निर्णय अधिवेशनामध्ये झाला.
राज्य महिला आयोग आणि उपसभापती कार्यालय यांनी मिळून नवनिर्वाचित महिला आमदारांची बैठक घेतली. काम करण्याच्या संदर्भामध्ये महिला आयोगाची माहिती व्हावी, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ज्या अडचणी असतील त्याचं निराकरण व्हावे आणि त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करावे, यावर चर्चा केली. तसेच पालघर, नंदुरबारमधील शाळांमध्ये आढळलेला खराब पोषण आहार, बालकांचे कुपोषण या घटनांचा विशेष उल्लेख करत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशांवरही चर्चा केली. दर्जेदार आहार मिळावा यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा निर्देशही त्यांनी दिला. भविष्यकाळात स्त्रियांच्या चळवळीत, राजकारणात अनाथ मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येईल. अनाथ मुला-मुलींचे विवाह जमविण्यासंबंधी राज्यातील विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाले.
पंडित बबनराव हळदणकर स्मृती ‘स्वरआदरांजली’ मैफलीचे रविवारी आयोजन
Newsworldmarathi Pune : आग्रा घराण्याचे थोर गायक आणि बंदिशकार कै. पंडित बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ गानवर्धन आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्या शिष्यवर्गातर्फे रविवार, दि. 29 डिसेंबर रोजी ‘स्वरआदरांजली’ या शास्त्रीय गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
गायन मैफल सकाळी 9 वाजता लोकमान्य हॉल, केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत सुप्रसिद्ध गायक मानस विश्वरूप आणि विख्यात गायिका कविता खरवंडीकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. कलाकारांना उदय कुलकर्णी (संवादिनी) आणि धनंजय खरवंडीकर (तबला) हे साथसंगत करणार आहेत, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
संभाजीनगर येथील युवा गायिका युगंधरा केचे हिला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. युगंधरा ही पंडिता शुभदा पराडकर यांची शिष्या आहे. पंडित बबनराव हळदणकर लिखित आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त ‘जुळू पाहणारे दोन तंबोरे’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ‘राग भेद आणि भावदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध गायक पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली मेट्रो स्टेशनची पाहणी
Newsworldmarathi Pune : नुकतेच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्ष प्रदेशाध्यक्ष बदलणे, न बदलणे हा केंद्राचा विषय आहे. पण साधारणत: दर तीन वर्षांनी आमची सगळी कार्यकारणी बदलत असते. ही लोकशाही प्रक्रिया आता आमच्याकडे सुरू आहे. पक्ष सदस्यता मग, सक्रिय सदस्यता आणि लोकशाही मार्गाने सर्व स्तरावर निवडणुका होत असतात.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सुशासन दिनानिमित्त सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला.यावेळी त्यांनी महामेट्रोचे प्रमुख श्रावण हर्डीकर यांचा सन्मान केला. त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोनची पाहणी केली.
स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने देशभर सुशासन दिन साजरा केला जातो. पुण्यात मेट्रो ही अतिशय उत्तम चालली असून सरासरी पावणे दोन लाख लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात. उत्तम प्रशासक म्हणून आज आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करत असून, मेट्रोने प्रवास देखील करत आहोत.६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडपणे सुरु आहे. त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकार तर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल.
पुणे शहरात दोन महापालिकांच्या प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले, याचा अंतिम निर्णय हा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पुणे शहराचे सर्वच प्रश्न माहीत आहेत. पण आम्ही १५ जानेवारीला पुण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट मागितली आहे. याच्या एक आठवड्यापूर्वी पुण्याचे महत्त्वाचे प्रकल्प आणि प्रश्न आम्ही त्यांना देणार आहोत. ३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही आशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे. त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे, म्हणून दोन महानगरपालिका केल्या पाहिजेत आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर समोर मांडणार आहोत.
पाटील यांना पुरंदर विमानतळा संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पुरंदर विमानतळाच्या सर्व परवानग्या झाल्या असून, भूसंपादनाबाबत गती पकडावी लागणार आहे. याला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, या विषयात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय करतात. तसेच त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय करतील. तसेच आमच्या पालकमंत्री पदाच्याबाबत कोणताही फॉर्म्युला नसून समन्वय हा आमचा फॉर्म्युला आहे.

