Homeपुणेबलूनमुळे प्रदूषणाचा धोका; पुणेकरांनी केली कारवाईची मागणी

बलूनमुळे प्रदूषणाचा धोका; पुणेकरांनी केली कारवाईची मागणी

Newsworldmarathi Pune : पुणे शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर बलून सोडण्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.

Advertisements

पर्यावरणप्रेमी अनंत रामचंद्र घरत, अध्यक्ष- माय अर्थ संस्था आणि सदस्य- एन्वायरनमेंट क्लब ऑफ इंडिया, यांनी एका सविस्तर पत्राद्वारे प्रशासनाकडे ही तक्रार नोंदवली. त्यांनी बलून सोडण्याच्या प्रथेमुळे जलप्रदूषण, वन्यजीवांना धोका, नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा, हवामान प्रदूषण, आणि कचरा निवारणाच्या समस्या यावर भर दिला आहे.

पत्रात नमूद केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार, बलून हवेत सोडल्यावर अनेकदा जलाशयात किंवा जमिनीवर पडतात. यामुळे जलचर प्राण्यांवर प्रतिकूल परिणाम होतो. बलूनचे तुकडे गिळल्याने मासे, पक्षी, आणि प्राणी मृत्युमुखी पडतात. लॅटेक्स किंवा फॉयल बलूनच्या विघटनास अनेक वर्षे लागतात, त्यामुळे हे कचऱ्याचे प्रमाण वाढवतात.

बलून सोडणे हे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ आणि पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या नियमांचे उल्लंघन असल्याचेही या पत्रात नमूद आहे. याशिवाय, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, ज्यावरही बलून सोडण्यामुळे विपरित परिणाम होतो.

सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये बलून सोडण्यावर प्रतिबंध. पर्यावरणीय परिणामांविषयी जनजागृती मोहिम. पर्यावरणपूरक पर्यायांचा प्रसार, जसे बायोडिग्रेडेबल सजावट. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी. बलून सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा मागण्या घरत यांनी प्रशासनालाकडे केल्या आहेत.

तक्रारीत पुढे नमूद केले आहे की, पुणे महानगरपालिका या समस्येवर तातडीने कार्यवाही न केल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) दाद मागण्यात येईल.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments