Newsworldmarathi Pune : मलेशिया मध्ये मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता टकले खडसरे या युवतीने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले. तब्बल साडेतीनशेहून अधिक रॅलीमध्ये सहभाग नोंदविलेल्या मुसा शरीफ निकिताचा सहचालक होता. राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेली निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली. स्पर्धेच्या चार विभागात निकिताने ट्रॉफी मिळविली आहे.
एम.आय.आर.सी रॅली ऑफ आशान, मलेशिया मध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, चायना देशातील सुमारे 22स्पर्धक सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय, राष्ट्रीय, पातळीवर स्पर्धेत अनेक वेळा भाग घेतला, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचनींना निकिताला सामोरे जावे लागले, त्यात भाषा, तंत्रज्ञान, नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागले, रॅली सूरु झाल्यावर पहिल्याच स्टेजमध्ये एक किलोमीटरला इलेक्ट्रिक समस्या झाली, कार दुरुस्त केली पुन्हा रॅलीत सहभागी होऊन पूर्ण केली, यामध्ये नऊ स्टेजमध्ये जास्त गुण मिळवून निकिताने सर्व समस्यांवर मात करत चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविली, सुमारे 365 रॅली त्यातील 86 आंतरराष्ट्रीय रॅलीत सहभाग असल्याने सहचालक मुसा शरीफ यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाल्याचे निकिता आवर्जून सांगते.
दोन दिवसीय रॅलीमध्ये पाऊस असल्याने खूप उष्ण वातावरण निर्माण झाले होते, उष्माघात चा त्रास अनेकांना सहन करावा लागला, वातावरण रॅलीसाठी उपयुक्त नव्हते, अशा परिस्थिती मध्ये नवखी आणि प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या निकिताने यश मिळविले, मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवघड रॅली मानली जाते, या रॅलीत सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात, त्यामुळे या रॅलीला अधिक महत्व आहे.
पामच्या झाडांमधून कार चालविताना फार सावध भूमिका घेत सहचालक मुसा शरीफ यांच्या सहकार्याने निकिता टकले खडसरेने चॅम्पियनशिप रॅलीत भारताचा झेंडा फडकविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळविणारी निकिता पहिली स्पर्धक ठरली आहे.
आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केलेले संजय टकले, गौरव गिल, अरोर अर्जुन राव, कर्णाकदूर यांच्या रांगेत बसण्याचा मान निकिता टकले खडसरेने मिळविला आहे.
राष्ट्रीय स्तरावर अनेक रॅली जिंकल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री यांचा मोलाचा वाटा असल्याचे निकिता आवर्जून सांगते. तसेच आंतरराष्ट्रीय डब्ल्यू आर सी रॅली जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला