श्रीनाथ भिमाले यांचा वाढदिवस आगळा वेगळा उपक्रम; प्रेमनगर परिसरातील लाडक्या बहिणींना आपुलकीची भेट
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २१ सॅलिसबरी पार्क – मुकुंदनगर (ड गट – सर्वसाधारण) येथील प्रेमनगर परिसरात पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी व म.न.पा.चे माजी सभागृहनेते श्रीनाथ यशवंत भिमाले यांच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना भेटवस्तू दिल्या.
यावेळी प्रभागातील महिलांनी मोठ्या उत्साहात श्रीनाथ भिमाले यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी भगिनींनी औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. भिमाले यांनी प्रत्येक भेटीत आपुलकीचा संवाद साधत महिला वर्गाशी संवाद साधला आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
या प्रसंगी भिमाले म्हणाले, “प्रभागातील नागरिकांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हाच माझा खरा ठेवा आहे. बहिणींनी दाखवलेली आत्मीयता ही माझ्यासाठी अनमोल भेट आहे.”
प्रेमनगर परिसरात झालेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक, महिला मंडळे व युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर चाललेल्या या भेटीच्या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे भिमाले यांनी सांगितले.
भारतात्मा वेद पुरस्कार सोहळा १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार
Newsworldmarathi Pune: स्वर्गीय श्री अशोकजी सिंघल जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या भारतात्मा वेद पुरस्काराचे वितरण १७ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. पुण्यातील दादासाहेब दरोडे सभागृह, आगरकर रोड, बीएमसीसी कॉलेंज जवळ , शिवाजीनगर येथे होणाऱ्या समारंभात परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत आणि परमपूज्य आचार्यजी श्री प्रद्युम्नजी महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. भारतात्मा वेद पुरस्काराच्या माध्यमातून वैदिक शिक्षण आणि विद्वत्तेचा गौरव करण्यात येतो.
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य असलेल्या स्व. सिंघल यांनी श्रीराम जन्मभूमी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. ते भारताच्या प्राचीन ज्ञानाचे एकनिष्ठ अनुयायी होते तसेच वैदिक ज्ञान परंपरा आणि गुरुकुल शिक्षण प्रणालीच्या पुनरुज्जीवन आणि प्रसारासाठी अत्यंत कटिबद्ध होते. स्व. सिंघल यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वेदांचा अभ्यास आणि आचरण यांचे जतन व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अमूल्य योगदान दिले.
भारतात्मा वेद पुरस्काराचे गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी प्रदान केला जात असून हे त्याचे नववे वर्ष असून आहे. तीन श्रेणींमध्ये असामान्य योगदानांचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात येतो.
•उत्कृष्ट वैदिक विद्यार्थी – ₹३ लाख रोख
•आदर्श वैदिक शिक्षक – ₹५ लाख रोख बक्षीस
•उत्कृष्ट वैदिक संस्था – ₹७ लाख रोख बक्षीस
प्रत्येक पुरस्कृताला प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हही प्रदान करण्यात येईल.
या समारंभात वेद अर्पित जीवन सन्मान म्हणजेच जीवनगौरव वैदिक समर्पण पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. वैदिक ज्ञानाचा अभ्यास, अध्यापन आणि सराव करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या विद्वानांना हा सन्मान दिला जातो. रोख ५ लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याच समारंभात भारतात्मा वेद पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची घोषणा केली जाईल.
“अँजिओग्राफीच्या रिपोर्टने खचलेल्या जगदीश मुळीक यांना देवाभाऊंचा फोन येताच परतला आत्मविश्वास!”
Newsworldmarathi Pune: भाजप नेते जगदीश मुळीक यांची नुकतीच अँजिओग्राफी पार पडली, दुसऱ्या दिवशी बायपास सर्जरी करण्यात आली, या दरम्यान त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्र्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेला फोन आणि आलेला अनुभव मुळीक यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती.
मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी डॉक्टरांशी स्वतः संवाद साधला, उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि आज, ऑपरेशननंतर काही दिवसांनी, स्वतः भेट द्यायलाही आले. त्यांच्या या भेटीतून मिळालं ते फक्त आशीर्वाद नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मविश्वासाचा अनमोल आधार असं म्हणत त्यांनी संपूर्ण प्रंसग सांगितला आहे.
जगदीश मुळीक यांची सोशल मिडीया पोस्ट
देवेंद्रजी फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर कार्यकर्त्यांना भावासारखे समजणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला अशाच नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व आपल्याला देवभाऊंच्या रूपाने लाभले आहे.
लग्नसोहळ्यात रक्तदानाचा अनोखा उपक्रम; सामाजिक बांधिलकीचे अद्वितीय उदाहरण
Newaworldmarathi Pune: लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची सुरुवात. अनेकजण या शुभप्रसंगी संगीत, डीजे किंवा वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतींनी हा दिवस साजरा करतात. परंतु, श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य श्री माऊली खाडे यांनी त्यांच्या शुभविवाहात एक वेगळाच सामाजिक संदेश देत, एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
हडपसर येथे पार पडलेल्या त्यांच्या विवाह सोहळ्यात, श्री माऊली खाडे यांनी ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीत आणत विवाह प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचा शुभारंभ श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री भूषण सुर्वे यांनी स्वतः रक्तदान करून केला.
या शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले, ज्यामुळे हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक न राहता प्रभावी सामाजिक कार्याचे उदाहरण ठरला.
या अनोख्या उपक्रमाचे उपस्थित पाहुण्यांकडून तसेच ट्रस्टच्या सर्व सदस्यांकडून भरभरून कौतुक करण्यात आले. श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकीची परंपरा जपण्याचे कार्य अनेक वर्षांपासून सातत्याने केले आहे. विवाहासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणी समाजाप्रती जबाबदारीची जाणीव जपण्याचा हा उपक्रम ट्रस्टच्या सामाजिक जाणिवेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.
या निमित्ताने रक्तदान चळवळीला एक नवा उर्जावान संदेश मिळाला असून, समाजातील तरुण पिढीसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला १००० ई-बस मंजूर: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
Newsworldmarathi Pune: पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ‘ई-बस’ खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे लवकरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात या बस समाविष्ट होतील. परिणामी, पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक भक्कम होऊन, कोंडी कमी होईल तसेच प्रदूषण नियंत्रणासाठीही मदत होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीसह ‘पीएमआरडी’च्या हद्दीत सेवा देणारी पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पीएमपीकडे सध्या २००० बस आहेत. त्यातील सुमारे ७५० स्वमालकीचा तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात किमान तीन हजार बस असणे आवश्यक आहे. म्हणून पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या बस दाखल करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. यासाठी मोहोळ यांनी एच.डी. कुमारस्वामी यांच्या वेळोवेळी प्रयत्न भेटी घेऊन पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे. या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साथ महत्त्वाची ठरली.
‘या बसेससाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक असलेले पत्र राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठवले जावे, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आला. त्यानंतर या १००० ‘ई-बस’ साठीचा प्रस्ताव पीएमपीएमलमार्फत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्याला गती मिळावी, यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच मी एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्लीत भेट घेत सविस्तर चर्चा केली होती. त्यांनीही तातडीने या प्रस्तावाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे पीएमपीला १००० ई बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोहोळ म्हणाले.
‘पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यावर आमचा भर आहे. सध्या शहरात ३२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावते आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोही लवकरच धावू लागेल. याशिवाय मेट्रोच्या विस्तारित मार्गांनाही मान्यता मिळाली आहे. त्याचजोडीला पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करणे हा माझा प्रमुख अजेंडा आहे. पीएमपीच्या ताफ्यात अधिकाधिक बस याव्यात, यादृष्टीने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. या पाठपुराव्याला यश मिळाले असून लवकरात लवकर या बस पीएमपीच्या ताफ्यात याव्यात, याला माझे प्राधान्य राहील,’असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कायमच शहरांच्या सर्वांगीण, सुनियोजित आणि शाश्वत विकासावर भर दिला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्ताराला प्राधान्य दिले गेले आहे. त्यानुसार पुणे-पिंपरी चिंचवड शहरासाठी एक हजार नव्या ‘ई ंबस’ खरेदीसाठी मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी धन्यवाद देतो,’ असे मोहोळ यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित
Newsworldmarathi pune: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. आज पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Pune Mahanagarpalika Election 2025) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 165 जागांसाठी ही आरक्षण सोडत महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर, अशी मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेच्या 165 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण 97 जागा आरक्षित केल्या होता. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिला 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वधारण 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारण 48 जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रारूप आरक्षण सोडत 17 तारखेच्या आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रभाग निहाय हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी हा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दुपारी 3 पर्यंत राहणार आहे. महापालिका येथील निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. ईमेल आणि गठ्ठ्याद्वारे हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे आज 11 वाजता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण जाणून घ्या एका क्लिकवर
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी राखीव जागांची विभागणी निश्चित करण्यात आली आहे.
नवीन प्रभाग रचनेनुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण जागांचे आरक्षण ठरविण्यात आले असून, यानुसार अनेक प्रभागांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सोडतीनंतर संभाव्य उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला याचा फायदा होणार आणि कोणत्या भागात अडचणी निर्माण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी
अ अनुसूचित जाती महिला
ब अनुसूचित जमाती
क OBC महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळ
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ विमान नगर लोहगाव
अ OBC महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोली
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५ कल्याणी नगर वडगाव शेरी
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ येरवडा गांधीनगर
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ गोखले नगर वाकडेवाडी
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९ सुस बाणेर पाषाण
अ अनुसूचित जमाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनी
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन जय जवान नगर
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक केशवनगर
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १६ हडपसर सातववाडी
अ OBC महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
१७. प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी माळवाडी वैदुवाडी
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १८ वानवडी साळुंखे विहार
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द कौसर बाग
अ OBC महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ बिबवेवाडी
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २१ मुकुंद नगर सॅलिसबरी पार्क
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी डायस प्लाॅट
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ नाना पेठ
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय केएमइ रुग्णालय
अ OBC महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई
अ OBC महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २६ घोरपडे पेठ गुरूवार पेठ समताभूमी
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ पर्वती
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
२८ जनता वसाहत हिंगणे खुर्द
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना हॅपी काॅलनी
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर हिंगणे होन कॉलनी
अ OBC
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३१ मयूर काॅलनी कोथरूड
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३२ वारजे पाॅप्युलर नगर
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३३ शिवणे खडकवासला धायरी पार्ट
अ OBC महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३४ नर्हे वडगाव बुद्रूक धायरी
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबाग
अ OBC महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर पद्मावती
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी कात्रज डेअरी
अ OBC सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर आंबेगाव कात्रज
अ OBC महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण महिला
इ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी
अ अनुसूचित जाती
ब OBC महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी उंड्री
अ अनुसूचित जाती महिला
ब OBC सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Newsworldmarathi Mumbai: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येत्या डिसेंबर महिन्यात ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. सोमवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली होती. परंतु आज (मंगळवार) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हेमा मालिनी, सनी देओल आणि मुलगी इशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं कळतंय. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. श्वसनाच्या त्रासामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत होते. त्यांचा शेवटचा ‘इक्किस’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि सहा मुलं- अभिनेता सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, अहाना देओल, अजिता आणि विजेता असा परिवार आहे.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट; मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट, तीन गाड्यांना आग, 8 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी
Newsworldmarathi Delhi: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. हा स्फोट मेट्रो स्टेशनजवळ पार्क केलेल्या कारमध्ये झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटाची तीव्रता हाय इंटेन्सिटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. एनआयएची टीम घटनास्थळी रवाना झाली असून दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे. फायर ब्रिगेडला सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी स्फोटाची माहिती मिळाली. जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, स्फोटात आठ गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून फॉरेन्सिक टीम तपासासाठी घटनास्थळी रवाना झाली आहे.
राजधानी दिल्ली हादरली; लाल किल्ला परिसरात स्फोट
राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत. याचे काही फोटो समोर आले आहे.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. हा स्फोट मेट्रो स्टेशनजवळ पार्क केलेल्या कारमध्ये झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटाची तीव्रता हाय इंटेन्सिटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. एनआयएची टीम घटनास्थळी रवाना झाली असून दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे. फायर ब्रिगेडला सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी स्फोटाची माहिती मिळाली. जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, स्फोटात आठ गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून फॉरेन्सिक टीम तपासासाठी घटनास्थळी रवाना झाली आहे.
राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत. या स्फोटानंतरचे काही फोटो समोर आले आहेत.
या स्फोटानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारमधील स्फोटानंतर आग लागली आसपास आल लागली आहे. ही आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे.
बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत

