Homeमनोरंजनडान्सचा महा-मुकाबला: निर्णय देताना रेमो डिसूझाची पंचाईत

डान्सचा महा-मुकाबला: निर्णय देताना रेमो डिसूझाची पंचाईत

Newsworldmarathi Mumbai : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांनीच डिझाईन केलेल्या नवीन फॉरमॅटमध्ये दर आठवड्याला डान्सचा थरारक सामना बघायला मिळतो. या शोमध्ये हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात रेमो डिसूझा परीक्षकांच्या पॅनलवर सर्वोच्च पदी आहे. तर, मलाइका अरोरा टीम IBD ला समर्थन देते आणि गीता कपूर टीम SD ला समर्थन देते. उत्कृष्ट कोरिओग्राफर्सच्या मार्गदर्शनाखाली 12 अद्भुत डान्सर्स दोन टीममधून एकमेकांशी आमनासामना करताना दिसतात.

Advertisements

या आठवड्यात, ऊर्फी जावेद आणि मनीषा रानी अनुक्रमे सुपर डान्सर आणि इंडियाज बेस्ट डान्सर या टीम्सचे मनोबल वाढवण्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. अंतिम सामन्यासाठी मंच सज्ज झाला. दोन्ही प्रतिस्पर्धी संघांनी आपला श्रेष्ठ डान्सर पाठवला, ज्यांच्यात अंतिम द्वन्द्व रंगले. 50 गुण मिळवून अंतिम फेरीतला पाचवा स्पर्धक निवडण्याची पात्रता मिळवण्यासाठी टीम्सची ही झुंज होती.

IBD चे प्रतिनिधित्व करण्यासाठी मलाइका अरोराने अनिकेतला पाठवले, तर गीता कपूरने गोड, छोट्याश्या फ्लोरिनाला सुपर डान्सर टीमच्या वतीने पाठवले. फ्लोरिनाची जबरदस्त एनर्जी आणि अनिकेतच्या अद्भुत मूव्ह्ज यांनी सगळ्यांना थक्क करून सोडले. लॉर्ड रेमोने दोघांच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले. त्याची खास ‘सर्वगुण संपन्न’ची दादही दिली. फ्लोरिनाच्या धमाकेदार ऊर्जेने तो विशेष प्रभावित झाला होता. गीता आणि मलाइका यांनीही त्या चिमुरडीचे खूप खूप कौतुक केले.

विजेता जाहीर करण्यापूर्वी लॉर्ड रेमोने आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “या लढतीत वय हा मोठा घटक होता. पण ही दोन टीम्समधली स्पर्धा असल्यामुळे आपण वयावर फोकस करू शकत नाही, आपण डान्सकडेच लक्ष दिले पाहिजे. जर त्यांच्या डान्सचे विश्लेषण केले, तर असे म्हणावे लागेल की, कुणी एक कमी अजिबात नव्हते, पण स्पर्धेतला दुसरा स्पर्धक अधिक उजवा होता, ज्याने पहिल्यावर कुरघोडी केली.

माझ्यासाठी तुम्ही दोघेही विजेता आहात पण ही फेरी ड्रॉ होऊ शकत नाही, त्यामुळे मला कुणा एकाची निवड करावीच लागणार.” आणि आता प्रत्येकाच्या डोक्यात असलेला प्रश्न हा आहे की, अनिकेत IBD साठी विजयश्री घेऊन येऊ शकेल की फ्लोरिना सुपर डान्सर्सना विजयाची भेट देणार? 50 गुण कोण जिंकणार आणि अंतिम फेरीतला पाचवा स्पर्धक निवडण्याची संधी कोण मिळवणार?

असे अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी आणि सर्वोच्च किताब कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी बघत रहा ही लढत, दर वीकएंडला रात्री 7.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments