Newsworldmarathi Nagpur : नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा महत्त्वाचा काळ असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्याबळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ताधारी बाकांवर दिसतील. महायुतीचा विजय आणि सरकारच्या धोरणांवर चर्चा होणार आहे.
विरोधी बाकांवरील संख्याबळ कमी असूनही, महाविकास आघाडी जोरदार भूमिका मांडण्याची शक्यता आहे. ईडी, शेतकरी प्रश्न, महागाई, आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर आक्रमक विरोध होऊ शकतो.
या अधिवेशनत शेतकरी कर्जमाफी आणि पिकविमा योजना यावर चर्चा होईल. राज्याच्या विकासासाठी अपेक्षित निधी, खासगीकरण, आणि इतर आर्थिक धोरणांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, आणि आदिवासी विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीसाठी दिशा ठरवणारे ठरणार आहे.