Newsworldmarathi Nagapur : मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ कामकाजात सहभागी न होणारे अजित पवार बुधवारी विधिमंडळ कामजात सहभागी होणार आहेत. अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे ते अधिवेशनामध्ये सहभागी झाले नव्हते. अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.
अजितदादांना घशाचा संसर्ग झाल्यामुळे ते दोन दिवस अधिवेशनात सहभागी झाले नव्हते. या काळात ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी आराम करत होते अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात अजित पवार यांनी मात्र भाग घेतला नव्हता. या काळात अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याची चर्चा सुरू होती.
महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी अजितदादांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याच्या बातम्या या काळात येत होत्या. त्यावर आता सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं ाहे. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.